कोल्हापूर

Kolhapur : राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गेल्या पंधरा दिवसात उघड झाप असलेला पाऊस कालपासून पुन्हा खवळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या पंधरा दिवसात उघड झाप असलेला पाऊस कालपासून पुन्हा खवळला आहे.

राशिवडे बुद्रुक : काल दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे आज पुन्हा खुले झाले आहेत. यामुळे भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पसरण्यास सुरुवात झाली असून दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज जोर अधीक वाढल्याने आणखी स्वयंचलित दरवाजे खुली होण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा दिवसात उघड झाप असलेला पाऊस कालपासून पुन्हा खवळला आहे. आज सकाळपासून तर त्याने उग्ररूप धारण केले आहे. परिणामी राधानगरी तालुक्यातील सर्व धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आज सकाळी अकराच्या दरम्यान राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजा पैकी एक सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला यानंतर बारा वाजून पन्नास मिनिटांनी पुन्हा दुसरा पाच क्रमांकाचा व तासातच म्हणजे एक पन्नासला तीन क्रमांकचा दरवाजा खुला झाला. या तीन दरवाज्यातून ४२८४ क्यूसेक तर वीज निर्मितीसाठी सोळाशे असे एकूण ५८८४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीचे पाणी पात्र बाहेर पसरू लागले आहे. पंचगंगा नदीची ही पाणी पातळी झपाट्याने वाढणार आहे.

आज तालुक्यात मुसळधार कायम असून पाणलोटक्षेत्रातून पाण्याची आवक अधिक असल्याने आणखी स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. याबरोबरच काळमावाडी आणि तुळशी धरण क्षेत्रातील पाणी पाऊस अधिक असल्याने विसर्ग सुरू वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT