कोल्हापूर

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले

भोगावती नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ

मोहन नेवडे

राधानगरी (कोल्हापूर) : पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीने जलाशय पाणीपातळीत वाढ झाल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज पुन्हा खुले झाले. त्यातून 5712 तर वीजनिर्मितीसाठी सोडलेले 1440 असा एकूण 7112 क्‍यूसेस पाणी विसर्ग सुरु आहे. भोगावती नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची गेल्या दहा दिवसातील तिसरी वेळ आहे. धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे सकाळी 10.30 तर, दोन दुपारी 4 वाजता खुले झाले. धरण क्षेत्रात 24 तासात 80 मिलिमीटर पाऊस झाला.

जलाशय पाणी पातळी स्थिर झाल्याने, काळम्मावाडी धरणाचे पाच ही वक्राकार दरवाजे सायंकाळी बंद करण्यात आले.

दरम्यान जलाशय पाणी पातळी स्थिर झाल्याने, काळम्मावाडी धरणाचे पाच ही वक्राकार दरवाजे सायंकाळी बंद करण्यात आले.सध्या पायथा विज गृहातून केवळ वीज निर्मितीसाठी एक हजार क्युसेस पाणी विसर्ग सुरू आहे.धरण क्षेत्रात 24 तासात 43 मिलिमीटर पाऊस झाला. धरण 83 टक्के भरले असून, पाणीसाठा 21 टीएमसी झाला आहे.धरण पूर्ण भरण्यास अद्याप साडेचार टीएमसी पाणीसाठा होणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT