कोल्हापूर

Good News - राधानगरी तालुका कोरोनामुक्तीकडे

राधानगरी तालुका हा डोंगरी भागाचा आणि भौगोलिक मोठा विस्ताराचा आहे.

- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : राधानगरी तालुक्याची (radhanagari) कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. २१२ गावांपैकी ८४ गावांत एकही रुग्ण नाही. पाचपेक्षा जादा रुग्ण असलेली केवळ दोन गावे असून १० पेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेले एकही गाव तालुक्यात शिल्लक नाही. (covid-19) प्रत्येक गावाला पालक अधिकारी आणि दहा गावांत समन्वय अधिकारी नियुक्त करून कोरोनावर नियंत्रण ठेवले. त्यांच्या माध्यमातून ही संख्या आटोक्यात आली असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले आहे. (kolhapur covid-19 update)

राधानगरी तालुका हा डोंगरी भागाचा आणि भौगोलिक मोठा विस्ताराचा आहे. साधारण दोन लाख लोकसंख्या आहे. तालुक्यात फेब्रुवारी मध्ये ३ हजार ४१९ कोविड रुग्ण होते. यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा संसर्ग रोखण्याकडे गाव पातळीपासून प्रांताधिकारी यांच्यापर्यंत सर्वांनीच लक्ष दिले. त्यामुळेच आज तालुक्यात केवळ ९४ कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत.

प्रत्येक गावांत पालक अधिकारी म्हणून तलाठी आणि १० गावांत मंडल अधिकारी किंवा विस्तार अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. यामुळे प्रत्येक गावांत कोरोनाची लक्षणे कोणाला आहेत यावर यंत्रणेचे बारकाईने लक्ष राहिले. यातून ज्याला लक्षणे आहेत त्यांचा तातडीने स्वॅब घेवून त्यांना अलगीकरण कक्षात ठेवले. संसर्ग वाढणार नाही याची दक्षता प्रत्येक दिवसाला घेतली जात होती.

दृष्टिक्षेपात

  • तालुक्याची लोकसंख्या २ लाख

  • फेब्रुवारीतील रुग्णसंख्या ३ हजार ४१९

  • आरटीपीसीआरची संख्या २३ हजार ३१४

  • ॲन्टीजेन टेस्ट १३ हजार ४७१

  • एकूण ॲक्टीव्ह रुग्ण संख्या ९४

  • १० पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या

    गावांची संख्या ०

  • ५ ते ९ रुग्णसंख्या असलेली गावे ८

  • १ ते ४ रुग्ण असलेल्या गावांची संख्या २६

  • एकही रुग्ण नसलेल्या गावांची संख्या ८४

"लक्षणे असलेल्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यावर भर, प्रत्येक गावात पालक अधिकारी आणि १० गावांत समन्वय अधिकारी नियुक्त, प्रांताधिकारी यांच्यापासून गावपातळीवरील अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी यामुळे विशेष लक्ष ठेवणे शक्य झाले. त्यातूनच तालुक्यातील ८४ गावे कोरोना मुक्त झाली आहेत. इतर गावेही लवकरच होतील."

- मीना निंबाळकर, तहसीलदार, राधानगरी तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT