Radhanagari Wildlife Sanctuary area has been declared as a sensitive area by the Central Government 
कोल्हापूर

राधानगरी अभयारण्याचे संवेदनशील क्षेत्र घटले : ४१ गावांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केला आहे. दोन वर्षांपूर्वी अभयारण्याच्या मध्यबिंदूपासून दहा किलोमीटर परिसरातील गावांचा समावेश केला होता; मात्र नव्या अधिसूचनेत अंतर कमी करून सहा किलोमीटर परिसरातील कोल्हापूर जिल्ह्यातील २६ आणि सिंधुदुर्गातील १५, अशा एकूण ४१ गावांचा समावेश केला आहे.

अभयारण्यातील जैवविविधता, वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठी अभयारण्याचा विस्तार केला. वन्यजीव जैविविधतेचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने अभयारण्य विस्ताराचा निर्णय घेतला होता; तेव्हा हे अंतर हवाई दहा किलोमीटर होते. त्यावर अनेक गावांनी विस्तारीकरणाला हरकती घेतल्या. त्या हरकतींचा विचार नव्या अध्यादेशात करण्यात आला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक समाधान चव्हाण यांनी या संदर्भातील पत्रकात म्हटले आहे, की राज्य शासनाने १६ सप्टेंबर १९८५ ला अधिसूचना काढून ३५१.१६ चौरस किलोमीटर क्षेत्रावर राधानगरी वन्यजीव अभयारण्य जाहीर केले.

१९८६ ला पर्यावरण कायदा झाला. त्यानुसार अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या बाहेरच्या सीमेपासून १० किलोमीटरपर्यंत संवेदनक्षेत्र राहील, अशी तरतुद करण्यात आली. त्यामुळे लोकांवर बंधने आली. राज्य आणि केंद्राकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उप वनसंरक्षक कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील २६ गावे (१५ हजार ०३९ हेक्‍टर क्षेत्र) व सिंधुदुर्गमधील १५ गावे (१० हजार २६ हेक्‍टर क्षेत्र) असे एकूण २५ हजार ०६६ हेक्‍टर क्षेत्रावर इको सेन्सेटिव्ह झोन प्रस्तावित केला आणि तो ९ ऑक्‍टोबर २०१९ ला केंद्र शासनाकडे पाठविला होता. त्यावर १५ ऑक्‍टोबर २०२० रोजी अधिसूचना प्रसिध्द झाली. राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने २०० मीटर ते ६.०१ किलोमीटरपर्यंत निश्‍चित केला. त्यामुळे राधानगरी अभयारण्यापासून १० किलोमीटरच्या गावांमध्ये असणाऱ्या बंधनापासून थोडी सुटका मिळाली आहे.

विस्तारित गावांसाठी निर्बंध
- नव्या उद्योगांना मनाई, अस्तित्वातील प्रदूषणकारी उद्योगांना विस्तारबंदी
- उत्खननासंदर्भातील प्रदूषणकारी उद्योग, लाकूड गिरणी, वीट्ट भट्टी, प्लास्टिक व्यवसायावर निर्बंध 
- घरबांधणी व दुरुस्तीसाठी जमीन खोदाईस मुभा
निगराणी समिती
जिल्हाधिकारी कोल्हापूर, सदस्य सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी प्रतिनिधी, राज्य शासनाचे वन्यजीव क्षेत्रात काम करणारा एक अशासकीय प्रतिनिधी, प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी, नगर योजनाकार, पाटबंधारे विभाग प्रतिनिधी, राज्य जैव विविधतेचा सदस्य, उपवनसंरक्षक वन्यजीव संरक्षक.
अभयारण्यातील वन्य धन
अभयारण्यात विविध प्रकारच्या वनस्पतींसह सस्तन प्राण्यांच्या ४७ प्रजाती, सर्प ५९ प्रजाती, उभयचर २० प्रजाती, फुलपाखरांच्या ६० प्रजाती व विविध प्रकारचे पक्षी याशिवाय गवे, पट्टेरी वाघ, बिबट्या, लांडगे, हत्ती, रानमांजरे, जंगली कुत्रे, शेखरू, हत्ती आदी वन्यजीव आहेत.

तालुकावार गावे अशी 
कोल्हापूर जिल्हा ः गगनबावडा ः बावेली, तळेखुर्द, बोरबेट, सालगाव, गारिवडे. राधानगरी ः राई कंदलगाव, मानबेट, पडसाळी, दुर्गमानवाड, पिरळ, हेळेवाडी, पणोरी, फराळे, लिंगाचीवाडी, एैनी. भुदरगड ः फये, अंतुर्ली, हेदवडे, एरंडपे, वासनोली, कोंडोशी, करंबळी, शिवडाव.
सिंधुदुर्ग ः कुडाळ ः दुर्गानगर, यवतेश्‍वर, जांभूळगाव
कणकवली ः नरडवे, रांजणगाव, नाटळ, कुंभवडे, भिरवंडे, रामेश्‍वर नगर, हरकुळ खुर्द, गांधीनगर, फोंडा, घोणसरी.  वैभववाडी ः कुर्ली, शिराळे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

माेठी बातमी! 'श्रीगोंदेत खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण'; अडीच कोटीची मागणी करत ३० लाख स्वाकारले, जिल्ह्यात खळबळ

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा प्लेइंग - ११

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT