Shivaji Maharaj Statue Rahul Gandhi Kolhapur Esakal
कोल्हापूर

Rahul Gandhi Kolhapur: राहुल गांधी करणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, का स्पेशल आहे कोल्हापूर दौरा?

Rahul Gandhi Shivaji Maharaj statue: राहूल गांधी कोल्हापुरात होणाऱ्या ‘संविधान सन्मान संमेलनात’ विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत संवाद साधतील.

आशुतोष मसगौंडे

कोल्हापूर: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या पाच ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांचा हा दौरा खास असणार आहे, कारण यावेळी राहुल गांधी कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.

राहुल गांधी कोल्हापुरात होणाऱ्या ‘संविधान सन्मान संमेलनात’ विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत संवाद साधतील.

दरम्यान येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा हा दौरा प्रदेश काँग्रेसला उर्जा देणार ठरणार आहे.

कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यासाठी सर्व प्रकारची तयारी केली जात आहे.

यावेळी काँग्रेस पक्षाने सांगितले की, संमेलनात सहभागी असणाऱ्या सर्व संघटनांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत संविधानासंदर्भात विस्तृत चर्चा केली जाणार आहे. प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान, गुरुवारी किंवा शुक्रवारी (ता. २७) राहुल गांधी यांचे यांचे पथक कोल्हापुरात येऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी करणार आहे. कार्यक्रमस्थळ आणि परिसराची पाहणी करून सुरक्षा तैनात केली जाणार आहे.

एका महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हा महिन्याभरातील दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. यापूर्वी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राहुल गांधी सांगलीतील सोनहीरा साखर कारखाण्यावर आले होते.

आता येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने राहुल गांधी यांचे महाराष्ट्र दौरे वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT