Rahul Rekhawar Yatra Jatra presence of 50 people kolhapur sakal
कोल्हापूर

५० जणांच्या उपस्थितीतच यात्रा-जत्रा

नियमांचे पालन करा; जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायतींना सूचना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे गेली दोन वर्षे गावागावांतील यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा कोरोना संसर्ग कमी होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील यात्रा व जत्रांसारखे धार्मिक कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास हरकत नसल्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या आहेत. त्यानुसार ज्या-त्या ग्रामपंचायतींनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते. कोरोना, डेल्टा पल्स आणि आता कोरोना ओमिक्रॉन अशा विविध व्हेरिएंटमध्ये कोरोनाचा फैलाव होत होता. त्यामुळे जिल्ह्यातील यात्रा, उरूस, जत्रा, माही रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले होते. यंदा कोरोना रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे यात्रा होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्ह्यात यात्रा व जत्रांना सुरुवात झाली आहे. यात्रा व जत्रांमध्ये किती लोकांचा सहभाग असावा, याचे नियोजन ज्या त्या ग्रामपंचायतींना करावे लागणार आहे. गावातील यात्रांसारख्या कार्यक्रमाला ५० लोक उपस्थित ठेवता येणार आहेत.

तसेच, एखाद्या ठिकाणी खेळण्यांसह इतर दुकाने उभारायची असतील, तर खुल्या व मोकळ्या जागेत असावीत. दोन दुकानांमध्ये पुरेसे अंतर असले पाहिजे. ज्या गावात यात्रा व जत्रा सुरू आहेत, त्या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जातात किंवा नाही याची खात्री करण्याचे काम तहसीलदार, स्थानिक स्वराज्य संस्थांना करावे लागणार आहे. कोरोना कमी होत असला तरीही सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असाही इशारा प्रशासनाकडून दिला आहे.

ग्रामीण अर्थचक्राचा कणा

ग्रामीण भागातील यात्रा सुरू झाल्याने पाळण्यासह इतर खेळ करणारे, प्लास्टिक खेळणी विक्री करणारे, आईस्क्रीम विक्री करून आपला चरितार्थ चालवणाऱ्या लोकांना थोडासा का असेना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हातावरचे पोट असणाऱ्या अशा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

जिल्ह्यात यात्रा व जत्रा करताना शासनाने दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल.

- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT