rai Dhamani Irrigation Project Funding information 
कोल्हापूर

प्रकल्प रेंगाळतच : धामणी’च्या निधीला कोरोनाचा संसर्ग

केरबा जाधव

धामोड ( कोल्हापूर)  : तीन तालुक्‍याला वरदायी ठरणाऱ्या राई (ता. राधानगरी) येथील धामणी पाटबंधारे प्रकल्पाचे अपुरे काम कोरोनामुळे शासनाच्या लालफितीत अडकले. १२० कोटींचा प्रकल्प १००० कोटींपर्यंत जाऊन पोहोचला तरी काम प्रलंबित आहे. गतवर्षी मंजूर झालेला निधी शासनाने कोरोनाकडे वळवल्याने प्रकल्पाबाबत पूर्णत्वाच्या आशा धूसर बनल्या आहेत. या प्रकल्पाचे तीस टक्के काम अपूर्ण आहे.


वनविभागाच्या गुंत्यापासून निधीच्या कमतरतेमुळे सातत्याने प्रकल्पाला खो घातला जात आहे. गतवर्षी प्रकल्पाला २३८.७३ कोटी निधी मंजूर झाला; पण कोरोनामुळे निधी नसल्याने टेंडर प्रक्रिया रद्द झाली. त्यामुळे या वर्षी काम सुरू होण्याची आशा धूसर झाली आहे. १६ नोहेंबर २००० मध्ये काम सुरू झालेल्या धामणी प्रकल्पाचे काम आजअखेर रखडले आहे. आमदार प्रकाश आबिटकर व आमदार पी. एन. पाटील यांनी गतवर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने २३८.७३ कोटी मंजूर झाले. कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग यांनी निविदा जाहीर केली; पण कोरोनामुळे मंजूर निधी अन्यत्र वळवला व टेंडर प्रक्रिया रद्द केली. ३.८५ टीएमसी धारण क्षमता असलेला व राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा या तीन तालुक्‍यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या धामणी प्रकल्पामुळे १५०० हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार आहे.


प्रकल्पातील अडीच टीएमसी पाणी कोल्हापूर शहरासाठी आरक्षित आहे. वाढणारे शहर व औद्योगिक विस्तार त्यामुळे प्रकल्प होणे महत्त्वाचे आहे. धामणीवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शहरवासीयांचाही बनायला हवा. शहरवासीयांनी आवाज उठवायला हवा
- महेश आठल्ये, धामणी संघर्ष कृती समिती

प्रकल्पासाठी मंजूर निधी शासनाने रद्द केला आहे. याबाबतचे परिपत्रक आले आहे. पुन्हा निधीबाबत शासन दरबारी कार्यवाही होईल. त्यानंतर या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाला जाणार आहे.
- एस. एन. पाटील, सहायक अभियंता धामणी प्रकल्प

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साह

SCROLL FOR NEXT