Railway General Manager Sanjeev Mittal visits Kolhapur Railway Station 
कोल्हापूर

रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट

शिवाजी यादव

कोल्हापूर - मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी आज कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने ,आमदार चंद्रकांत जाधव यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वे प्रवासी हिताच्या विविध मागण्या मांडल्या तसेच प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात ही चर्चा केली.

कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक सध्या ए ग्रेड दर्जाचे आहे. येथील सोयीसुविधा तसेच रेल्वे कामकाजाचा आढावा घेण्यासाठी श्री मित्तल यांनी येथे भेट दिली. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांचे रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर  मिरज मार्ग विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे तसेच रेल्वे स्थानकावर तीन फलाटांचे कामकाज सुरू आहे, प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष सुरू झाला आहे तसेच अन्य पायाभूत सुविधा तयार होत आहेत त्याची घेतली. त्यासाठी रेल्वेस्थानकावर त्यांनी फेरफटका मारून या पायाभूत सुविधांची पाहणी केली. यानंतर खासदार मंडलिक, खासदार माने व आमदार जाधव यांच्यासोबत चर्चाही केली. यात मिरज कोल्हापूर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून या मार्गावर पूर्णवेळ विद्युतीकरण केलेल्या गाड्यांमधून  प्रवासी वाहतूक सुरू व्हावी तसेच बंद केलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू व्हाव्यात, बहुतांशी रेल्वेगाड्यांच्या वेळा व मार्ग  निश्चित करताना प्रवाशांच्या सूचनांचाही विचार व्हावा, आधी मागण्या लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या. रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे विविध मार्गावर रेल्वे गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

यात कोल्हापूर दिल्ली , कोल्हापूर अहमदाबाद, कोल्हापूर तिरुपती सोलापूर मार्गे, आदी मार्गांवर रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करावी अशी मागणी करण्यात आली.
 रेल्वे स्थानकाची इमारत 135 वर्षे जुनी असून या इमारतीचे वैभव कायम ठेवून नव्या इमारतीची बांधणी करावी अशी मागणीही   रेल्वे प्रवासी संघटनांच्या वतीने करण्यात आली.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT