कोल्हापूर

Railway : लवकरच सुरु होणार कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस? मोठी अपडेट आली समोर

Kolhapur Mumbai Vande Bharat Express: सध्या कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते धनबाद या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या कोल्हापुरात आल्यावर सुमारे ४८ तास थांबून असतात.

सकाळ वृत्तसेवा

Kolhapur Mumbai Railway Rout : मुंबई-कोल्हापूर मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, वळिवडे आणि रुकडी या स्थानकांवर रेल्वेचा थांबा पूर्ववत सुरू करावा, यासह अन्य मागण्या खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्या.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोल्हापूर-मुंबई या मार्गावर प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या नेहमी प्रवाशांनी भरलेल्या असतात. अशावेळी कोल्हापूर-मुंबई मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी.

तसेच कोल्हापूर स्थानकावरून सुटणाऱ्या बहुतेक सर्व रेल्वेगाड्या वळिवडे आणि रुकडी या स्थानकांवर थांबत होत्‍या. मात्र, कोरोना काळात हे थांबे रद्द झाले आहेत. ते पूर्ववत सुरू करावेत. रेल्वेचा पुणे विभाग मनमाडपर्यंत विस्तारित केल्यास कोल्हापूरहून शिर्डी साईनगरपर्यंत एखादी विशेष रेल्वे सुरू करता येईल. त्यातून हजारो भाविकांना मोठी सुविधा निर्माण होईल. सध्या मिरज ते परळी या मार्गावर डेमो ट्रेन सुरू आहे. ही गाडी कोल्हापुरातून सुरू करावी.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणाऱ्या कोयना एक्सप्रेसमध्ये चार जनरल डबे वाढवावेत. कोल्हापूर ते सांगलीदरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे आधुनिकीकरण करावे. अमृत भारत योजनेअंतर्गत सध्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि विस्तारीकरण होत आहे. त्या अंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभा करावा. सध्या कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते धनबाद या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या कोल्हापुरात आल्यावर सुमारे ४८ तास थांबून असतात.

अशावेळी या रेल्वे गाड्या, सोलापूर किंवा कलबुर्गी मार्गावर सोडता येतील का, याचाही विचार करावा. या सर्व मुद्द्यांचा व मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यवाही केली जाईल, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी खासदार महाडिक यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT