Heavy rain in Kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain : कोल्हापूरला धुवांधार पावसाने झोडपले; 52 बंधारे पाण्याखाली, रात्री अकराला पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोटक्षेत्रात (Kolhapur Flood) अतिवृष्टी तर इतरत्र धुवाँधार पावसाने झोडपून काढले.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील १२२ प्रमुख जिल्हा व २४ राज्य मार्गांपैकी तीन जिल्हा व दोन राज्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने बंद झाले आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणलोटक्षेत्रात (Kolhapur Flood) अतिवृष्टी तर इतरत्र धुवाँधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यासह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सकाळी सातला पंचगंगेची पातळी २१.९ तर रात्री आठला २७.७ फुटापर्यंत होती.

रात्री पावणे अकरा वाजता पंचगंगेचे (Panchganga River) पाणी पात्राबाहेर पडले. बारा तासात सुमारे सहा फुटाने पातळी वाढली. पंचगंगा पात्रातून पुढे जाणारा विसर्ग २८६.१४ क्युसेक आहे. नदीची इशारा पातळी ३९ तर धोका पातळी ४३ फूट आहे. राधानगरी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने १२०० क्युसेक विसर्ग आहे.

दरम्यान, पूल पाण्याखाली गेल्यामुळे बर्की धबधबा आणि ओढ्यावर पाणी आल्याने रांगणा किल्ला पर्यटकांसाठी बंद केला आहे. ट्रेकसाठी रांगणा किल्ला (Rangana Fort) येथे गेलेल्या पण ओढ्यावर पाणी आल्यामुळे अडकून पडलेल्या १७ जणांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, महसूल अधिकारी व ग्रामस्थांनी सुखरुप बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून दमदार पावसाने जोर धरला होता. पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे ओढे, नाल्यांसह ओहळ दूथडी वाहत आहे. परिणामी जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे विविध पावसाळी पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यातील १२२ प्रमुख जिल्हा व २४ राज्य मार्गांपैकी तीन जिल्हा व दोन राज्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने बंद झाले आहेत. तेथे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. गेल्या अनेक दिवसपासून अपेक्षित असलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. गेल्या तीन दिवसांत १६ ते १८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. आतापर्यंत ८५ ते ८७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

सकाळी ७ पासून जिल्ह्यातील जनजीवन

  • - बर्की (ता. शाहूवाडी) धबधब्याकडे जाणारा पूल सकाळी नऊच्या सुमारास पाण्याखाली गेल्याने बर्की धबधबा पाहण्यासाठी बंद झाला आहे.

  • - रांगणा किल्ला ट्रेकला गेलेल्या १७ जणांसह शेकडो पर्यटकांना ग्रामस्तांनी सुखरुप बाहेर काढले

  • - टेकवाडी (ता. गगनबावडा) येथील मोहरीवर पाणी आल्याने वेतवडे, बालेवाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.

  • - मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे मोठे झाड पडल्याने वाहतूक बंद

  • - किटवडे (ता. आजरा) धरण वाहतूक मार्गावर पाणी आल्याने रस्ता बंद

  • - साळगाव पुलावर पाणी आल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

  • - वारूळ येथे मोठे झाड रत्यावर पडल्याने वाहतूक खोळंबली

हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले :

  • - अणदूर तलाव सायंकाळी ६.१५ ला पूर्णक्षमतेने भरला

  • - कळसादे लघु पाटबंधारा सकाळी दहा वाजता पूर्ण क्षमतेने भरला

  • - जांबरे मध्यम प्रकल्प दुपारी ४.४५ ला पूर्ण क्षमतेने भरला

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बंद झालेले रस्ते :

  • करवीर-शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. ही वाहतूक आंबेवाडी, चिखली मार्गे सुरू आहे.

  • चंदगड - इब्राहिमपूर पूल (घटप्रभा नदी) तीन फूट पाणी आल्याने रस्ता बंद असून कुरणी, गवसे, अडकूर रस्ता मार्गे वाहतूक सुरू आहे.

  • आजरा - हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद. ही वाहतूक बाचणी, पेरनोळी मार्गे सुरू आहे.

  • शिरोळ - शिरोळ बंधाऱ्यावर दोन फूट पाणी आहे. त्यामुळे शिरोळ, कुरुंदवाड या राष्ट्रीय महामार्गावरुन वाहतूक सुरु आहे.

  • गगनबावडा येथील मोरीवर पाणी आल्याने रस्ता बंद याला पर्यायी मार्ग नाही.

मार्ग एकूण रस्ते बंद असलेले रस्ते

  • राज्य २४ २

  • प्रमुख जिल्हा १२२ ३

पाण्याखाली गेलेले बंधारे ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यापैकी महत्त्‍वाचे बंधारे असे :

  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे. कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली.

  • हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी.

  • घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर

  • वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली.

  • कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली, वारणा नदी

  • चिंचोली : माणगाव, तांदूळवाडी, कडवी, भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे

पर्यटकांसाठी बंद :

रांगणा किल्ल्यासह बर्की येथील पुलावर व ओढ्यावर पाणी आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. पाणी वाढण्याचा वेग जास्त असल्याने लोकांनी सर्तक रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT