Rains in the kolhapur district flattened the crops of 24951 farmers 
कोल्हापूर

जिल्ह्यात पावसाने 24951 शेतकऱ्यांची पिके भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा

 कोल्हापूर  : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे मोठे नुकसान झाले आहे. 10 ते 16 ऑक्‍टोबर दरम्यान, तब्बल 3 हजार 336 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 24 हजार 951 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. 
गेल्या आठवड्यापासून परतीसह वादळी पावसानेही झोडपून काढले. जिल्ह्यात 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तहसिलदार, सर्कल, तलाठी व ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले जात आहेत. जिल्ह्यात चंदगड तालुक्‍यात सर्वाधिक 1200 हेक्‍टर क्षेत्राचे आणि 13 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्‍यातही भात, सोयाबीन व ऊस जमीनदोस्त झाला आहे. 
आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टी तर काही ठिकाणच्या मुसळधार पावसाने पिकांना पाण्याखाली घेतले. कापणी व मळणीसाठी 
परिपक्व भात आणि सोयाबीनचा चिखल झाला. शासनाकडून याचे पंचनामे केले जात आहे. चंदगड, राधानगरी, करवीर तालुक्‍यात अनेक ठिकाणी भात पिक साचलेल्या पाण्यामध्येच गळून पडले आहे. हिच परिस्थिती सोयाबीन आणि भुईमूगाचीही आहे. अजूनही पंचनामे सुरू असून नुकसानीची आकडा वाढणार आहे. 


गाव, शेतकरी निहाय पिकांच्या नुकसान असे (आकडेवाडी हेक्‍टरमध्ये) 
गावे* शेतकरी संख्या* भात* ऊस* भुईमूग* सोयाबीन* भाजीपाला* ज्वारी* फुलपिके* उडीद* नाचणी* इतर* एकूण 
404* 24951* 1970* 556* 296* 95* 225* 10* 30* 2* 163* 66* 3336 

जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यात सर्व पिकांचे 3336 हेक्‍टरवरील नुकसान दिसून येत आहे. अजूनही पंचनामे केले जात आहे. त्यामुळे, आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. 
ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : गोरेगावमध्ये ट्रक-बस अपघात: सहा प्रवासी जखमी, बसचालक ताब्यात

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT