Rajaram Factory Election Result
Rajaram Factory Election Result esakal
कोल्हापूर

Rajaram Factory Election Result : सतेज पाटलांना पहिल्याच फेरीत धक्का; महाडिक गट 'इतक्या' मतांनी आघाडीवर

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.

Rajaram Factory Election Result : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामुळं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडं लागलंय.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. आज दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीत यंदा 91.12 टक्के चुरशीनं मतदान पार पडलं. सध्या निकालाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी महाडिक गटानं पहिल्या गटात सरासरी 844 मतांनी आघाडी घेतली आहे. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी सुरु आहे. दोन फेऱ्यात मोजणी प्रक्रिया संपणार असून, पहिली फेरी दुपारी साडेबारापर्यंत संपणार असली तरी दुपारी दोननंतरच निर्णायक आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

निकाल असा

गट क्रमांक 1 (फेरी क्रमांक 1)

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल

- बेनाडे शालन बाबुराव (रुई) 2441

- भोसले किरण 2413 बाबासोा (रूकडी)

सत्ताधारी महाडिक पॅनेल

- भोसले विजय वसंत 3244

- मगदूम संजय बाळगोंडा 3169

उत्पादक गट क्रमांक 2

सत्ताधारी महाडिक पॅनेल

- शिवाजी रामा पाटील 3198

- सर्जेराव बाबुराव भंडारे 3173

- अमल महादेवराव महाडिक 3358

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल

- शिवाजी ज्ञानू किबिले 2261

- दिलीप गणपतराव पाटील 2328

- अभिजीत सर्जेराव माने 2184

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT