Rajaram Sugar Factory Election Result esakal
कोल्हापूर

Rajaram Sugar Factory Result : 'राजाराम'वर महाडिकांची पुन्हा एकहाती सत्ता; तब्बल 21 जागांवर विजयी घौडदौड

महाडिक गटानं कारखान्याच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर विजयी घौडदौड सुरु केलीये.

सकाळ डिजिटल टीम

मिळालेल्या माहितीनुसार, महाडिक गटाचे सर्व 21 उमेदवार आघाडीवर आहेत. उमेदवार सरासरी अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Rajaram Sugar Factory Election Result : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी कोल्हापुरातील रमणमळा शासकीय गोदामात सुरु आहे. यामध्ये निवडणुकीचे कल आता स्पष्ट होत आहेत.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या कालामध्ये सत्ताधारी महाडिक गटानं (Mahadik Group) पुन्हा एकदा बाजी मारत सत्ता अबाधित राखली आहे. महाडिक गटाचे उत्पादक गट क्रं 1 मधून विजय भोसले, संजय मगदूम विजयी झाले. दुसऱ्या फेरीतील पहिल्या गटात देखील महाडिक गटाने बाजी मारली. महाडिक गटाच्या उमेदवारांनी जवळपास 1357 मताधिक्याने विजय मिळवला. महाडिक गटाचे आतापर्यंत 21 पैकी 3 उमेदवार विजयी झाले आहेत.

महाडिक गटाचं कोल्हापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन

मतमोजणी फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आज रात्री उशिरा अंतिम निकालावर औपचारिक शिक्कामोर्तब होणार आहे. या निवडणुकीत महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी पहिला विजय मिळवला. या विजयानंतर महाडिक गटाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

महाडिक गटातील तीन उमेदवारांचा विजय

मिळालेल्या माहितीनुसार, महाडिक गटाचे सर्व 21 उमेदवार आघाडीवर आहेत. उमेदवार सरासरी अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत. महादेवराव महाडिक यांना 83 मतं मिळाली आहेत. विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मतं मिळाली आहेत. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालांत महाडिक गटातील तीन उमेदवारांचा विजय झाल्याचं कळतंय.

विजयामुळं कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली

महादेवराव महाडिक यांनी विजयाचे श्रेय सभासदांबरोबरच माजी आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना दिले आहे. या विजयामुळे कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याचे महाडिक यांनी सांगितलं.

आमचे तगडे उमेदवार जाणीवपूर्वक बाद केले - सतेज पाटील

आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीतील पराभव स्वीकारला आहे. ते म्हणाले, वाढीव सभासदांमुळं आमचा पराभव झाला आहे. आम्ही या पराभवाचं आत्मपरिक्षण करणार आहोत. ही निवडणूक वेगळ्या वळणावर जाणं अपेक्षित नव्हतं, असं त्यांनी सांगितलं. आमचे तगडे उमेदवार जाणीवपूर्वक बाद केले, असाही त्यांनी आरोप केला.

सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मतं-

उत्पादक गट क्रमांक एक

विजय वसंत भोसले ६८०३

संजय बाळगोंडा मगदूम ६६५१

उत्पादक गट क्रमांक दोन-

शिवाजी रामा पाटील ६६९२

सर्जेराव बाबुराव भंडारे ६५९८

अमल महादेवराव महाडिक ६९३६

उत्पादक गट क्रमांक तीन -

मारुती भाऊसाहेब किडगावकर ६७६०

विलास यशवंत जाधव ६५४८

सर्जेराव कृष्णा पाटील ६४४६

उत्पादक गट क्रमांक चार -

तानाजी कृष्णा पाटील ६६३६

दिलीप भगवान पाटील ६६६५

मीनाक्षी भास्कर पाटील ६५९३

उत्पादक गट क्रमांक- पाच

दिलीप यशवंत उलपे ६७४२

नारायण बाळकृष्ण चव्हाण ६५४५

उत्पादक गट क्रमांक सहा -

गोविंदा दादू चौगुले ६७५५

डॉ. विश्वास सदाशिव बिडकर ६६१०

अनुसूचित जाती जमाती गट

नंदकुमार बाबुराव भोपळे ६५९९

महिला राखीव गटातून वैष्णवी राजेश नाईक ६८३७

कल्पना भगवानराव पाटील ६८११

इतर मागास प्रतिनिधी गट

संतोष बाबुराव पाटील ६८७०

भटक्या विमुक्त जाती जमाती गट

सुरेश देवाप्पा तानगे ६८८४

आमदार सतेज पाटलांच्या राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तनच्या उमेदवारांना मिळालेली मतं -

गट क्रमांक एक मधून

शालन बाबुराव बेनाडे ५२९४

किरण बाबासो भोसले ५२३६

गट क्रमांक दोन-

शिवाजी ज्ञानू किबीले ५०२३

दिलीप गणपतराव पाटील ५१११

अभिजीत सर्जेराव माने ४७७५

सभासद गट क्रमांक तीन -

बळवंत रामचंद्र गायकवाड ४८६०

विलास शंकर पाटील ४८७५

विठ्ठल हिंदुराव माने ५०८५

गट क्रमांक चार -

दिनकर भिवा पाटील ४७३१

सुरेश भिवा पाटील ५२३८

संभाजी शंकराव पाटील ५०६०

गट क्रमांक पाच -

विजयमाला विश्वास नेजदार'५३६६

मोहन रामचंद्र सालपे ५०८५

गट क्रमांक सहा-

दगडू मारुती चौगुले ५२७७

शांताराम पांडुरंग पाटील ५२०६

महिला प्रतिनिधी गटातील उमेदवार -

निर्मला जयवंत पाटील ५३२७

पुतळाबाई मारुती मगदूम ५२२६

इतर मागास प्रतिनिधी -

मानसिंग दत्तू खोत ५३४२

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी

बाबासो थळोजी देशमुख ५३७२

भटक्या जाती विमुक्त जमाती गटातील उमेदवार -

रामांना अण्णा विठू ५३४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंचनामे अपूर्ण, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत अशक्यच! थकबाकीमुळे २७ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद, कर्जवसुलीचे लिखित आदेश नाहीतच

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

Ranjitsinh Naik-Nimbalkar: फलटणला कधीच युती होणार नाही: रणजितसिंह नाईक- निंबाळकर; मनोमिलनावर भाष्य, निवडणुकीत घटक पक्षातील लोकांना संधी देणार

Diwali Party Snack Recipe: दिवाळीत चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा कुरकुरीत चणा चिली, लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT