Amal Mahadik vs Satej Patil esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : 'गोकुळ'नंतर आता 'राजाराम'ची सभा चांगलीच गाजणार; वादावादीची दाट शक्यता, महाडिक-पाटील गट येणार आमने-सामने!

‘गोकुळ’च्या (Gokul Dudh Sangh) राजकारणाचे पडसादही या सभेत उमटणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सभेची वेळ सकाळी ११ ची आहे, ती गैरसोयीची असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

कोल्हापूर : कार्यक्षेत्र वाढीसह अन्य मुद्यांवरून कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याची (Rajaram Sugar Factory) शुक्रवारी (ता. २९) होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा गाजण्याची शक्यता आहे. ‘गोकुळ’च्या (Gokul Dudh Sangh) राजकारणाचे पडसादही या सभेत उमटणार आहेत.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर सभा होणार आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या ‘राजाराम’च्या निवडणुकीत संचालक पदाच्या सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी एकहाती कारखान्याची सत्ता मिळवली आहे.

या जोरावर कारखान्याच्या काही पोटनियमात दुरूस्तीचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आले आहेत. त्यात कार्यक्षेत्रात आणखी ४४ गावांचा समावेश करण्यात येणार असून त्यात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील १४ गावांचाही समावेश आहे. याला कारखान्याच्या विरोधी गटाचा तीव्र विरोध आहे.

यातून महाडिक हे कारखाना त्यांच्या मालकीचा करत असल्याचा आरोप विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला आहे. या निर्णयासह निवडणूक लढवण्याचे निकष, उमेदवारांची पात्रता यासंदर्भातील नियमातही बदल करण्यात येणार आहे. त्यावरून सभेत वादावादीची शक्यता आहे.

सभेची वेळ सकाळी ११ ची आहे, ती गैरसोयीची असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. १०० किलोमीटरहून जास्त अंतरावर कारखान्याचे सभासद आहेत. गुरूवारी सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन आहे, त्या मिरवणुका रात्री उशीरापर्यंत चालणार आहेत. त्यामुळे ही वेळ बदलून दुपारी एकची करावी, अशी मागणी होती. पण त्यातही सत्तारूढ गटाने बदल केलेला नाही.

समांतर सभा होणार

‘राजाराम’ची सभा ११ वाजता सुरू करून बहुमताच्या जोरावर सर्व विषय एकाच टप्प्यात मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. विरोधक पोहचण्यापूर्वीच सभा झाली तर त्याच परिसरात विरोधकांकडून समांतर सभा घेतली जाण्याची शक्यता आहे. तशी तयारी विरोधकांच्या पातळीवर सुरू आहे.

प्रश्‍नांची उत्तरे देणार

‘कारखान्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या दौऱ्यात सभासदांचे प्रश्‍न जाणून घेतले आहेत. ज्यांनी लेखी प्रश्‍न विचारले आहेत, त्यांना पोस्टाने त्याची उत्तरे पाठवली आहेत. याशिवाय सर्व प्रश्‍नांची खुलासेवार उत्तरे सभेत देऊ. यासाठी सभासदांनी सभेला उपस्थित राहून आम्ही नियोजित केलेल्या प्रकल्पाला सहकार्याची भूमिका घ्यावी,’ असे आवाहन अध्यक्ष अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्यात उपोषणाला सुरुवात

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT