Rajaram Sugar Factory Sabha Kasaba Bawada Amal Mahadik
Rajaram Sugar Factory Sabha Kasaba Bawada Amal Mahadik esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : 'महाडिक धुमधडाका अन् एकच साहेब बंटी साहेब’ घोषणेमुळं सभेत गोंधळ; विरोधकांकडून ठरावाची होळी

सकाळ डिजिटल टीम

'आमची स्पर्धा आपल्या विरोधाला नाही. आपण कारखान्याच्या हितासाठी ज्या सूचना द्याल, त्याचा निश्‍चितपणे विचार केला जाईल.'

कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sugar Factory) वार्षिक सभेत पोटनियम दुरुस्ती, सहवीज प्रकल्प व मशिनरी आधुनिकीकरण या महत्त्वाच्या दोन ठरावांसह पत्रिकेवरील ११ ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले. तर, सभासदांच्या हिताला मारक ठरणारे विषय मंजूर केल्याबद्दल विरोधकांनी विषय पत्रिकेची होळी करून सत्तधारी गटाचा निषेध नोंदवत सर्व विषय नामंजूर केले.

सभा सुरू होण्यापूर्वीच मंजूर-ना-मंजूरच्या घोषणा, ‘महाडिक-महाडिक धुमधडाका’ आणि ‘एकच साहेब बंटी साहेब’ या घोषणाबाजीमुळे सभेच्या कामामध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.

कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर झाली. साखर कारखान्याच्या पोटनियम दुरुस्तीच्या ठरावाला विरोधी आमदार पाटील यांच्या गटाने कडाकडून विरोध केला होता. तर, हा ठराव सभासदांच्या हिताचा असल्याचा दावा अध्यक्ष अमल महडिक यांनी केला होता. याच ठरावावरून दोन्ही गटांत जोरदार घोषणाबाजी झाली.

दरम्यान, काल सकाळी ११ वाजता सभा सुरू झाली. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. याचवेळी व्यासपीठाजवळ सभासदांऐवजी कार्यकर्ते बसवून आरेरावी केल्याचा आरोप करत विरोधकांनीही नामंजूरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक (Amal Mahadik) म्हणाले, ‘देशातील साखर कारखाने प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत आहेत. त्यामुळे कारखान्यांना केंद्र व राज्य शासनाचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. कारखान्याला शासकीय जमीन मिळाल्यानंतर स्वमालकीचा इथेनॉल प्रकल्प उभारणी होऊ शकते किंवा एखादा इथेनॉल प्रकल्पही भाडेतत्त्वावर घेतला जाणार आहे. बायो सीएनजी प्रकल्प उभा करण्याचा मानस आहे. को-जनरेशन प्रकल्प उभारला जाणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातून दोन ते तीन महामार्ग जाणार आहेत. त्यामुळे हजारो हेक्टर ऊस कमी होणार आहे.

कारखान्यासाठी कर्ज आणि स्वभांडवलाचा विचार करता कारखाना क्षेत्रात गावे वाढवावी लागत आहेत. स्वभांडवल वाढीसाठी आयुक्तांनी सुचवल्याप्रमाणे स्वत:ची पंचवीस टक्के रक्कम जमा करावी लागेल.’ कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नारायण चव्हाण, माजी आमदार महादेवराव महाडिक, संचालक दिलीप पाटील, दिलीप उलपे, शिवाजी पाटील, तानाजी पाटील, डॉ. मारुती किडगांवकर, सर्जेराव भंडारे आदी उपस्थित होते.

प्रकल्पाची किंमत वाढली

‘कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाची किंमत आणि मशिनरी आधुनिकीकरण करण्यासाठी गेल्यावर्षी ठराव झाला होता. यावेळी, या प्रकल्पाची किंमत १२७ कोटींवरून १४९ कोटी ९० लाख रुपये झाली आहे. या प्रकल्पासाठी २० कोटी स्वभांडवल जमा करणार आहे. बँकांकडून १२७ कोटींचे कर्ज घेतले जाणार आहे. दहा वर्षांत या कर्जाची परतफेड केली जाईल’, अशी माहिती कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी दिली. कारखान्याच्या वार्षिक सभेसाठी २६ लेखी प्रश्‍न विचारले आहेत. या सर्वांना रजिस्टर पोस्टाने उत्तरे पाठवली आहेत. यापैकी ६ प्रश्‍नांची उत्तरे आणि खुलासा कार्यकारी संचालक चिटणीस यांनी दिला.

Rajaram Sugar Factory sabha Kasaba Bawada

पोटनियम दुरुस्ती योग्यच

‘राजाराम कारखान्याकडे जादा ऊसपुरवठा झाला पाहिजे. कारखान्याच्या कामकाजात सभासदांचा सहभाग वाढला पाहिजे. तसेच, कारखान्याविषयी आत्मीयता आणि दृढविश्‍वास असलेल्या सभासदांना कारखान्याच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व करता यावे, यासाठी पोटनियमात दुरुस्ती करण्याचा ठराव आणला आहे’, असे अध्यक्ष अमल महाडिक यांनी सांगितले. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. उसाचा तुटवडा जाणवणार आहे. सभासदांनी आपला सर्व ऊस राजाराम कारखान्याला देऊन ५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार सतेज पाटील लक्ष्य

‘कारखान्याच्या कारभारावरून काही लोकांकडून दिशाभूल केली जात आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवले आहे. सभासद वाढवले म्हणजे कारखान्याचे खासगीकरण केले असे होत नाही. कारखान्यात को-जनरेशन करणार म्हणून विरोधकांचा अजेंडा होता. आता आम्ही को-जन करणार, मशिनरी दुरुस्त करताना तुम्ही त्याला विरोध का करता?,’ असा सवालही अमल महाडिक यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना केला. ‘आमची स्पर्धा आपल्या विरोधाला नाही. आपण कारखान्याच्या हितासाठी ज्या सूचना द्याल, त्याचा निश्‍चितपणे विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

मुदत संपलेल्या ठेवीला मुदतवाढ

कारखान्याच्या बिगर सभासदांच्या ठेवींची मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे. अशा ठेवींची मुदत ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. याला मंजुरी देण्यात आली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Earth's Core Slowing Down : पृथ्वीच्या गाभ्याचं फिरणं झालंय कमी;दिवसाच्या लांबीवर परिणाम?संशोधनातून समोर आलेलं रहस्य जाणून घ्या

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi Live Updates : लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन!

SCROLL FOR NEXT