Amal Mahadik vs Satej Patil esakal
कोल्हापूर

Rajaram Factory : 'गुंडांच्या जोरावर सभा गुंडाळलीये, कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही'; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

छत्रपती राजाराम कारखान्याची वार्षिक सभा (Rajaram Sugar Factory) गुंडांच्या जोरावर गुंडाळली.

सकाळ डिजिटल टीम

कारखान्याच्या मागच्या दारांनी आलेल्या लोकांनी कारखान्यावर मालकी मिळवली आहे.

कोल्हापूर : ‘छत्रपती राजाराम कारखान्याची वार्षिक सभा (Rajaram Sugar Factory) गुंडांच्या जोरावर गुंडाळली आहे. कारखान्याच्या वाढीव सभासदांच्या ठरावाविरुद्ध सनदशीर मार्गाने न्यायालयीन लढा दिला जाईल. पोटनियम दुरुस्तीचा ठराव जोपर्यंत मागे घेत नाहीत, तोपर्यंत कारखान्याचे धुराडेही पेटू देणार नाही’, असा इशारा विरोधकांनी समांतर सभेत दिला.

छत्रपती राजाराम परिवर्तन आघाडीच्या (Chhatrapati Rajaram Parivartan Aghadi) वतीने कारखाना कार्यस्थळावर समांतर सभा घेण्यात आली. यावेळी विविध नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. राजाराम साखर कारखान्याची ३९ वी वार्षिक सभा झाली.

सभेपूर्वी सकाळी दहा वाजता विरोधी छत्रपती राजाराम परिवर्तन आघाडीच्या वतीने मोहन सालपे, ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगले, माजी अध्यक्ष सर्जेराव माने, विठ्ठल माने, बाबूराव बेनाडे, बाजीराव पाटील, बबन रानगे यांच्यासह विरोधी गटाचे नेते आणि सभासद घोषणा देत सभास्थळी आले. ‘वाचवा रे वाचवा, कारखाना वाचवा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना सभागृह खचाखच भरल्यामुळे पुढे जाण्यास संधी मिळाली नाही. विरोधी गटाच्या सभासदांनाही व्यासपीठापर्यंत जाता आले नाही. मागे थांबून संपूर्ण सभा ऐकावी लागली. त्यांना त्यांचे मत मांडता आले नसल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. तसेच, चुकीच्या पद्धतीने होत असेलेल्या ठरावांना नामंजूर-नामंजूर म्हणून विरोध केला.

प्रामाणिक सभासदांना सभागृहाबाहेर ठेवल्याचा आरोप करत विरोधकांनी कारखाना स्थळावरच समांतर सभा घेतली. कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने म्हणाले, ‘सभेला बनावट सभासद आणले आहेत. गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना पुढे बसवून सभेतील विषय मंजूर करून घेतले आहे. ज्यांचा कारखान्याशी संबंध नाही, असे लोक आणून महाडिक यांनी पंढरपूर, सोलापूर, सांगली येथून आणलेल्या बनावट सभासदांमुळे ७ हजार सभासदांना मांडवाबाहेर उभा राहावे लागले.

Rajaram Sugar Factory sabha Kasaba Bawada

कारखान्यातील ८ हजार सभासदांचा ऊस तोडला जात नाही. तरीही, कारखान्याचा विस्तार केला जात आहे. यातून येलूर आणि सांगली जिल्ह्यातील सभासद करून कारखाना हडपण्याचा डाव आहे. भविष्यात हा कारखाना सांगली जिल्ह्याच्या ताब्यात ठेवला जाणार आहे. पाचशे सभासद असणाऱ्या भादोले गावाला वगळले आहे.’

डॉ. संदीप नेजदार म्हणाले, ‘बनावट सभासद रद्द होईपर्यंत हा लढा आम्ही सुरू ठेवणार आहे. कारखान्यातील मूळ सभासद मयत झाल्यानंतर वारसा नोंद करून हे सभासद पात्र करून घेतले जात नाहीत. याबद्दलही याचा जाब विचारला जाईल. ’

बाजीराव पाटील म्हणाले, ‘राजाराम कारखान्यावर हुकूमशाही आहे. आमचे २९ उमेदवार छाननीत काढले, मात्र तुमचे १३१४ बनावट सभासद निघाले आहेत. म्हणून तुमचा विजय झाला. हा विजय म्हणजे बनावट विजय आहे.’ संजय पाटील म्हणाले, ‘मूळ मालक असणाऱ्या सभासदांना सभागृहात जाता आले नाही. गाळप क्षमता वाढवून कारखाना मालकीचा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे.’

माजी संचालक बाबासोा देशमुख म्हणाले, ‘ताळेबंदात ३० कोटी ८८ लाखांचा तोटा दिसत आहे. नको असलेले पाच घटक टाकून ताळेबंदात फिरवाफिरवी केली आहे.’ मोहन सालपे म्हणाले, ‘साडेनऊ हजार सभासदांचा ऊस गाळपासाठी कारखाना आणू शकत नाही हे दुर्दैव आहे. भगवानराव पवार ऊस विकास योजनेतील एक रुपयाही खर्च केलेला नाही. या योजनेतील एकही सवलत उत्पादक सभासदांना दिली नाही. सत्ताधाऱ्यांचा सभासदांना फसविणारा कारभार सुरू आहे.’

मागच्या दारांनी आलेल्यांनी मालकी मिळवली

‘कारखान्याच्या मागच्या दारांनी आलेल्या लोकांनी कारखान्यावर मालकी मिळवली आहे. कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी आमदार सतेज पाटील यांचे प्रयत्न होते. १२७४ सभासद बनावट निघाले. निवडणुकीपूर्वी हा प्रकार समोर आला असता तर कारखान्यामध्ये परिवर्तन झाले असते’, असे माने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chief Justice India: सरन्यायाधिशांचे वादग्रस्त वक्तव्य अन् सारवासारव..

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

SCROLL FOR NEXT