कोल्हापूर

खासदार मंडलिकांना चकवा, मंत्री यड्रावकरही बंडखोरांच्या गोटात

खासदार मंडलिकांना चकवा; ‘मातोश्री’साठी निघाले; पण सुरतमध्ये पोचले

सकाळ वृत्तसेवा

खासदार मंडलिकांना चकवा; ‘मातोश्री’साठी निघाले; पण सुरतमध्ये पोचले

कोल्हापूर - आपण शिवसेनेबरोबरच आहे, पक्षप्रमुखांनी ‘मातोश्री’वर बोलवलेल्या बैठकीला हजर राहणार, असे सांगणारे जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हेही रात्री उशिरा सुरतमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या बंडखोर आमदारांच्या गोटात दाखल झाले. पहाटे तेथून ते गुवाहाटीला रवाना झाले.

दरम्यान, श्री. यड्रावकर यांना मुंबईला घेऊन येण्याची जबाबदारी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर होती. त्याप्रमाणे काल खासदार मंडलिक हे यड्रावकर यांना घेऊन मुंबईत दाखल झाले; पण मंडलिक यांनाच चकवा देत यड्रावकर यांनी सुरत गाठल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यड्रावकर शिरोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. ते ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणूनही त्यांची ओळख आहे. पण, जागावाटपात शिरोळची जागा आघाडीतील घटक पक्षाला गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. विजयानंतर त्यांनी सेनेला पाठिंबा दिला. पहिल्यांदाच विधानसभेत पोचलेल्या श्री. यड्रावकर यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली.

सोमवारी (ता. २०) रात्री नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरत गाठली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यामुळे शिवसेनेने पक्षांसह पाठिंबा दिलेल्या आमदारांना मुंबईत येण्याचे आवाहन केले होते.

याची जबाबदारी काही खासदारांवर सोपवली. मंत्री यड्रावकर यांना मुंबईला आणण्याची जबाबदारी प्रा. मंडलिक यांच्यावर होती, त्याप्रमाणे प्रा. मंडलिक यड्रावकर यांना घेऊन मुंबईत दाखल झाले. तिथे गेल्यावर आवरून येतो, असे सांगत यड्रावकर यांना प्रा. मंडलिक यांना चकवा देत मध्यरात्रीच मोटारीने सुरत गाठले. पहाटे इतर आमदारांबरोबर त्यांनी गुवाहाटीला प्रयाण केले.

मंडलिकांवर जबाबदारी का?

जिल्हा बँकेचे सहा संचालक विधानसभेत विजयी झाले आहेत. या विजयानंतर जिल्हा बँकेत आयोजित सत्कार समारंभात प्रा. मंडलिक यांनी जिल्हा बँकेच्या संचालकांना निवडून आणायचे हे ठरले होते, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. जिल्ह्यातील पाच सेनेच्या विद्यमान आमदारांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. प्रा. मंडलिक यांच्या वक्तव्याने या पराभूत आमदारांतही नाराजी होती. जिल्हा बँकेच्या राजकारणातून प्रा. मंडलिक व श्री. यड्रावकर यांच्या असलेल्या मैत्रीतून त्यांच्यावर श्री. यड्रावकर यांना मुंबईत आणण्याची जबाबदारी सोपवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT