rajesh kshirsagar appeal to kolhapur people for fight against corona 
कोल्हापूर

कोरोनाविरोधातील लढाईसाठी राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरकरांना केले आहे 'हे' आवाहन 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनावर लस नसल्याने त्यावर मात करण्यासाठी प्रशासनास मर्यादा येत आहेत. सद्यस्थितीचा विचार करता रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. कोरोना विरोधातील लढाईत शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. वाढती संख्या पाहता तालीम संस्था. शैक्षणिक संस्थांनी स्वंयफूर्तीने पुढे यावे. असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. 

दातृत्व काय असते हे महापूराच्या काळात कोल्हापुरकरांनी दाखवून दिले आहे. कमी तेथे आम्ही ही कोल्हापुरकरांची खासियत आहे. महापूरातून कोल्हापूर सावरते न सावरते तोपर्यंत कोरोनाने संकटकाळाने ग्रासले. लॉकडाऊन काळातील धान्य वाटप अथवा आरोग्य विषयक वस्तू देऊन मदत केली आहे. त्यामुळे परस्परांच्या सहकार्याने स्थिती रुळावर येत असताना गेल्या दहा दिवसात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

 प्रशासन तसेच डॉक्‍टर हे देवदूताप्रमाणे काम करतात. त्यांना नेहमीच सहकार्य केले आहे. कोरोना रुग्णांवर उपचाराची गती वाढवून जास्तीत जास्त रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी क्वारंनटाईन केंद्राची संख्या वाढविणे गरजेची आहे. शाहूकालीन तालीम संस्था तसेच शेकडो मंडळे आहेत. त्यांच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने त्यांच्याही वर्ग खोल्या रिकाम्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मंगल कार्यालयेही आहे. सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन क्षीरसागर यांनी केले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

क्षुल्लक कारणावरून वाद, लाथाबुक्यांनी मारहाण करत बंदुकीचा धाक; शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठार मारण्याची धमकी; ठाण्यात काय घडलं?

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Pune PMPML Security: सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च, तरी आगारांत सुरक्षारक्षकच नाहीत; पीएमपीएमएलचा धक्कादायक कारभार उघड

SCROLL FOR NEXT