Satej Patil may be Guardian Minister of Kolhapur 
कोल्हापूर

आयटीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा होणार गौरव; सतेज पाटील

राजीव गांधी यांच्या नावे राज्य सरकार देणार पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराला असलेले माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे नाव बदलून हॉकीतील जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. त्यावरून वादप्रतिवाद सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दरवर्षी राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी म्हणजे २० ऑगस्टला त्याचे वितरण होईल, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिली.

राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी केला. हा निर्णय ७ जुलैला माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री असलेल्या सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर आधुनिकीकरणाचा केंद्र बिंदू आहे. राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार व परिणामकारक वापर करण्यावर भर दिला होता. म्हणून त्यांच्या स्मृतिदिनी या क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा, असा निर्णय बैठकीत झाला.

त्यानुसार आता राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या विभागावर आर्थिक भार पडणार नाही, अशा पद्धतीचा हा पुरस्कार असावा, असेही म्हटले आहे. या पुरस्काराची निवड आणि नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देव तारी त्याला कोण मारी! केदारनाथ प्रलयात मृत्यू झाल्याचं समजून प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले, पण तो १० वर्षांनी पुण्यात सापडला

बाई हा काय प्रकार? १०० वेळा 'जब वी मेट' बघणाऱ्यांच्याही लक्षात आली नसेल चित्रपटातली ती चूक; शेवटच्या गाण्यात...

Pune News : देशाचा जीडीपी वाढण्यात सहकाराची मोठी मदत होईल - प्रा डॉ. दुर्गाडे; सन्मित्र सहकारी बँकेच्या वतीने पतसंस्थांसाठी सहकार मेळावा!

Nashik Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरवरूनच जाणार! रेडिओ दुर्बिणीचे कारण अयोग्य; पर्यायी मार्गासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा लढा

Christmas Tree History: पहिला ख्रिसमस ट्री कोणत्या देशात तयार झाला? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT