Rajiv Kisanrao Awale Former MLA car story by sandeep khandekar
Rajiv Kisanrao Awale Former MLA car story by sandeep khandekar 
कोल्हापूर

राजीव आवळेंच्या नंबरात ‘कोल्हापुरी ब्रॅंड’ची झलक

संदीप खांडेकर

कोल्हापूर : राजीव किसनराव आवळे माजी आमदार. जनसुराज्य शक्ती पक्षाचे तत्कालीन उमेदवार. राजकारणात ते आजही सक्रिय आहेत. गावातल्या मतदारांशी त्यांचा संपर्क तुटलेला नाही. उपेक्षित समाजासाठीच्या कामात त्यांना रस आहे. जनसंपर्कासाठीकरिता त्यांच्या घरात नव्या गाड्यांची खरेदी झाली. त्यांचा नंबर सेम असावा, असा कुटुंबातील सदस्यांचा आग्रह नव्हता. एमएच ०९ कोल्हापूरचा पासिंग नंबरशी साजेसा नंबर असावा, असे त्यांना वाटले. गाडीसाठी ९९९१ नंबरवर शिक्कामोर्तब झाले. ‘कोल्हापुरी ब्रॅंड’ची झलक नंबरमधून दिसते, हे सांगायला ते विसरत नाहीत.

किसनराव आवळे वंचित घटकांसाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व. काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी हमाल, हातमाग कामगार, उपेक्षित घटकांना एकत्र केले. इचलकरंजीत मातंग समाजाचा मेळावा घेण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. ॲम्बेसिडरमधून त्यांचा गावोगावी फेरफटका होता. तिचा नंबर ६७१८ होता. तो वैशिष्ट्यपूर्ण असावा, अशी त्यांची इच्छा नव्हती. फियाट खरेदीनंतर त्याची कुटुंबीयांना प्रचिती आली. या गाडीवरचा नंबर ४८८७ होता. त्यांचा मुलगा राजीव आवळे यांनी ९९९१ची परंपरा सुरू केली.


राजीव आवळे इचलकरंजीतल्या आर्टस्‌, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी. बी. ए.च्या पदवीसाठी त्यांचा इतिहास विषय होता. शिवाजी विद्यापीठाचे ते सिनेट मेंबरही होते. इचलकरंजी नगरपालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून कामही पाहिले. जनसुराज्य पक्षातून त्यांनी २००४ मध्ये तत्कालीन पेठवडगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. चुलते जयवंतराव आवळे यांचा त्यांनी पराभव केला. प्रचारासाठी ७७९९ नंबरच्या सफारीचा त्यांनी उपयोग केला. कोल्हापुरी ब्रॅंडची झलक दाखविणारा नंबर त्यांना हवा होता. त्यासाठी ९१९९ ला त्यांनी पसंती दिली. नव्या गाड्यांवर तोच नंबर घेतला जातोय. किसनराव माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, पायोनियर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची त्यांनी स्थापना केली आहे. नवमहाराष्ट्र नागरी पतसंस्थेच्या कामकाजावरही त्यांची देखरेख असते.

किसनराव आवळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य थांबलेले नाही. हॅंडीकॅप्ड व्यवसाय प्रशिक्षणातून ते रोजगार निर्मितीला हातभार लावत आहेत. या संस्थांतल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांत त्यांच्या गाड्यांचा नंबर हिट ठरलाय. उपेक्षितांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याचा त्यांचा बाणा आहे. भाऊ डॉ. सीमोन मानसोपचारतज्ज्ञ, तर अब्राहम इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक आहेत. त्यांनाही राजीव यांच्या गाड्यांच्या नंबरचा हेवा वाटतो. बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. त्यानिमित्त त्यांचा महाराष्ट्रात दौरा ठरलेला आहे. त्यांच्या गाडीचा नंबरही कार्यकर्त्यांच्या लक्षात राहणारा ठरलाय. राजकारणातही ते सक्रीय असून, कार्यकत्यांचा गट कार्यरत आहे. तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचे व्रत सोडलेले नाही. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT