raju shetti criticised on the statement of aashish shelar and pravin darekar in kolhapur 
कोल्हापूर

'सत्तासुंदरी नसल्याने शेलार आणि दरेकर देवदास झालेत'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भाजपचे आमदार आशिष शेलार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हातात सत्तासुंदरी नसल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्याची अवस्था देवदासासारखी झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

भाजपाच्यावतीने काढण्यात आलेल्या शेतकरी आत्मनिर्भर यात्रेत शेलार व दरेकर यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली होती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शेट्टी कोल्हापुरात होते, त्यावेळी त्यांनी या टिकेला प्रत्युत्तर दिले. 

आत्मनिर्भर यात्रेच्या माध्यमातून कृषी कायदे कसे महत्वाचे आहेत? शेती क्षेत्राच्या दृष्टीने कसे हिताचे आहेत, हे सांगण्यासाठी आत्मनिर्भर यात्रेचे आयोजन भाजपने केले होते. मात्र त्यांना हे पटवून सांगता आले नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी आत्मनिर्भर यात्रेचे नौटंकी भाजपने केली, असेही श्री. शेट्टी म्हणाले. मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने हे सगळे सैरभैर झाले आहेत. ही यात्रा फसलेली असून या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे.


कोटीचा दंड भरायचा का?

भाजप सरकारचे शेतकऱ्यांच्या वरील प्रेम बाहेर पडत आहे. पंजाब मधील शेतकऱ्यांनी पाचोळा जाळला तर त्यांना एक कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. उद्या महाराष्ट्रात उसाचा फड पेटवला तर एक कोटी दंड भरायचा का? असा सवाल शेट्टी यांनी केला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT