राजू शेट्टी ईसकाळ
कोल्हापूर

कोल्हापूर - महावितरण कार्यालयासमोर राजू शेट्टींचा रात्रभर ठिय्या

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळत नाही तोपर्यंत ठिय्‍या आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. यासाठी कोल्हापुरातील (Kolhapur News) ताराबाई पार्कातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाजवळ शेतीसाठी दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या मागणीसाठी कोल्हापूर वीज वितरण कार्यालयामोर राजू शेट्टी यांनी काल रात्रभर ठिय्या मांडला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत या कार्यालया समोर रात्रभर आंदोलन चालू ठेवले आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी (Collector office) कार्यालयावर मोर्चा काढला होता. तेव्हा चार महिने महानिर्मितीचे चांदोलीतील जलविद्युत प्रकल्प जाणीवपूर्वक बंद ठेवले होते. हे प्रकल्प बंद ठेवल्याने खासगी कंपन्यांची वीज महावितरणला घेता यावी, असा हेतू असावा. जनतेच्या पैशाने बांधलेले प्रकल्प बंद ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर रात्री नऊ वाजता चांदोलीचे वीज (Chandoli porject) प्रकल्प सुरू केले. सध्या ते प्रकल्प २४ तास चालू असल्याचेही ते म्हणाले.

यासाठी दिवसा वीज द्या

शेतीसाठी रात्री वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पुरवठा करताना शेतकऱ्यांना सर्पदंश होतो. यातून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अपघात होण्याचा संभव वाढता आहे. या बाबी विचारात घेऊन शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्यावी, अशी मागणी करीत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT