Raju Shetti protest 10 hours daily power supply for agriculture kolhapur sakal
कोल्हापूर

स्वाभिमानीतर्फे शुक्रवारी चक्का जाम; राजू शेट्टी

राजू शेट्टी; उर्जामंत्री राऊत यांचे चर्चेसाठी निमंत्रण; आंदोलन सुरूच ठेवणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘शेतीसाठी दिवसाला दहा तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन करू तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही चर्चेला बोलावले आहे. मात्र आंदोलन सुरू ठेवून चर्चेला जाणार आहोत.’’ अशी माहिती स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. असे सांगून शेट्टी म्हणाले, ‘‘सकाळीच ऊर्जामंत्री राऊत यांनी फोनवर संर्पक केला आहे. त्यांनी चर्चेसाठी यावे असे सांगितले. संघटना चर्चेला तयार असते. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. बैठकीची तारीख लवकरच जाहीर होईल.’’

दरम्यान मागणी मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार चक्का जाम आंदोलनाचे आवाहनही केले आहे. त्यानुसार ग्रामीण भागात आंदोलन होणार आहे. अशात एक दोन जिल्ह्यात दिवसा विजेची मागणीच नसल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यात तथ्य नसून शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा नको आहे. दिवसाच वीज पुरवठा द्यावा अशी मागणी परजिल्ह्यातील शेतकरीही करीत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

विविध घटकांचा पाठिंबा

आंदोलनास विविध घटकांचा पाठिंबा मिळत असून निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला. जिल्हा बार असोसिएशननेही पाठिंबा देत आंदोलनात जितक्या केस दाखल होतील त्या मोफत चालविण्याचे आश्वासन दिले आहे. पेठवडगाव डॉक्टरांचे पथक सायकलवरून आले त्यांनीही पाठिंबा दिला. शेतकरी आंदोलकांना जेवण देत आहेत, असेही श्री शेट्टी यांनी सांगितले.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष

शेतीसाठी दिवसा दहा तास वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, दोन मंत्री येथे भेट देऊन गेले. ऊर्जामंत्र्यांनी आज तुम्ही चर्चेला का येत नाही असे फोन विचारले तेव्हा आम्ही चर्चेला तयारच असल्याचे सांगितले. मात्र मागणी मान्य होई पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ही सांगितल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT