raju shetty accepts ncp proposal mla offers  
कोल्हापूर

शरद पवार यांनी शब्द पाळला!... माजी खासदार राजू शेट्टी होणार आमदार 

गणेश शिंदे

जयसिंगपूर (कोल्हापूर) : राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर अखेर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि  शेट्टी यांच्यातील बैठकीत अपेक्षेप्रमाणे ही निवड झाली. स्वाभिमानीला एक जागा देण्याचा शब्द श्री पवार यांनी पाळला.


लोकसभा निवडणूकीत श्री पवार यांनी शेट्टी यांना विधानपरिषदेची एक जागा देण्याचा शब्द दिला होता. विधानपरिषद निवडणूकीच्या काळात याबाबत श्री शेट्टी यांनी पत्र लिहून याची आठवण करुन दिली होती. यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी शेट्टी यांची भेट घेऊन हा प्रस्ताव ठेवला. यानंतर श्री शेट्टी यांनीच विधानपरिषदेवर जावे यासाठी पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची काहीशी पिछेहाट झाली असून या काळात श्री शेट्टी यांनीच हे पद घ्यावे असा त्यांच्यावर दबाव निर्माण झाला होता.

श्री पवार कोकण दौऱ्यावर असल्याने चर्चा लांबणीवर पडली होती. कोकण दौऱ्यावरुन परतल्यानंतर बारामतीत गोविंदबाग यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शेट्टी यांच्या नावावर एकमत झाले. राज्यपाल नियुक्त म्हणून विधानपरिषदेवर सामाजिक क्षेत्रातून श्री शेट्टी यांची वर्णी लागणार आहे. पक्षातील अन्य कोणाचेही नाव पुढे केले असते तर मात्र कदाचित तांत्रिक मुद्दाही पुढे आला असता. त्यामुळे शेट्टींनाच या पदावर संधी देण्यावर श्री पवार आग्रही राहिले. दिर्घ काळ झालेल्या या चर्चेत शेट्टी यांच्या नावावर एकमत झालेच. शिवाय श्री पवार यांनी शेट्टींचा पाहुणचार करताना गोविंदबागही फिरून दाखविली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे सेक्रेटरी चंगेजखान पठाण उपस्थित होते. दरम्यान, सध्या अडचणीच्या काळात शेट्टींमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना उभारी मिळाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Earthquake : इराणवर आता नैसर्गिक संकट ! अमेरिका अन् इस्त्रायलचे बॉम्बहल्ले सुरु असतानाच भूकंपाने देश हादरला

इराणमध्ये शाळा बनली कब्रस्तान! JCBने १६० मुलींच्या मृतदेहाचे दफन; अमेरिका म्हणते, जाणीवपूर्वक हल्ला केला नाही

Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT