raju shetty protest of against in agriculture bill in kolhapur 
कोल्हापूर

माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून नव्या कृषी विधेयकाची होळी ; विधेयकाविरोधात देशभरात संताप 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. याचाच एक भाग म्हणून  राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी देशभरात दौरा सुरू केला आहे. ते काल कोल्हापुरात आले होते. याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या अंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (ता. २५) सकाळी त्यांच्या घरासमोर कृषी विधेयकाची होळी केली. 


सुधारित शेतकरी विधेयकाच्या विरोधात आज 260 विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी विधेयकाची होळी करताना भारतीय जनता पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली. 

सुधारीत शेतकरी व विधेयेकाच्या विरोधात आज संपूर्ण भारतात 260 विविध शेतकरी संघटनांनी कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने केले होते.  

सरकारने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी करत विधेयकाची होळी करण्यात आली. आज देशभरात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे विधेयकाची होळी करण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला देशभरातील विविध भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

‘कृषी विधेयक मागे घ्या’, ‘केंद्र शासनाने केंद्र शासनाचा अधिकार असो’ अशा घोषणा देत या विधेयकाची होळी करण्यात आली. यावेळी शेट्टी म्हणाले, मोदी सरकारच्या या विधेयकामुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडणार जाणार आहे. केंद्र शासनाला शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल तर आधी कृषी उत्पादनांना हमीभावाची खात्री द्यावी. त्या संदर्भातील कायदा मंजूर करावा असे विधेयक मी 2008 साली संसदेमध्ये मांडले होते. ते मंजूर केले तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, अन्यथा शेतकरी हिताच्या नावावर कार्पोरेट कंपन्यांचे भले होणार आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ हे विधेयक माघे घ्यावे अन्यथा या विधेयकाच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन यापुढेही सुरू राहिल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

शेतकरी संघटना समन्वय समिती, किसान सभेचे अध्यक्ष डॉ. उदय नारकर, कॉ. नामदेव गावडे, ऊसतोडणी संघटनेचे प्रा. सुभाष जाधव, शेकापचे बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, बाबुराव कदम, आम आदमी चे संदीप देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश भोजकर आदींचे नेतृत्वाखाली शहरातही शेती विधेयकांची होळी करण्यात आली.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT