Sanjay Raut esakal
कोल्हापूर

राजकीय घडामोडींना वेग; शिवसेना नेते संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेनं राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निश्चित केलाय.

Rajya Sabha Election 2022 : सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे ती, राज्यसभेच्या सहाव्या जागेची. राज्यसभेची (Rajya Sabha) सहावी जागा शिवसेनेचाच उमेदवार लढवणार असल्याची वाच्यता शिवसेना (Shiv Sena) नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. अशातच आज शिवसेना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. राज्यसभेबाबत संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati) भूमिकेबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. अशातच शिवसेनेनं राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निश्चित केलाय. कोल्हापूरचे (Kolhapur) जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता केवळ संजय पवारांच्या नावाची अधिकृत घोषणा बाकी आहे.

सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींना ऑफर दिली होती. परंतु, संभाजीराजेंनी यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं आता शिवसेनेनं आपला उमेदवार निश्चित केलाय. शिवसेनेनं सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचं नाव शिक्कामोर्तब केलंय. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) कोल्हापूर दौऱ्यावर जाणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

शिवसेना नेते संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी संजय राऊत यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं संजय राऊत कोल्हापुरात जाणार आहेत. राऊतांचा कोल्हापूर दौरा चार दिवसांचा असणार आहे. याबाबतचं वृत्त मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझानं दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT