0 
कोल्हापूर

कोल्हापुरात अंत्यसंस्करानंतर दुसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जन

युवराज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जन करण्याची सूचना स्मशानभूमी व्यवस्थापनाने केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. 

पंचगंगा स्मशानभूमीलगत असलेल्या रस्त्यावरील शेडमध्ये कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोल्हापुरात अंत्ययात्रेला गर्दी होते. कोरोनाच्या काळात ही गर्दी न परवडणारी असल्याने प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी वीस लोकांना परवानगी दिली आहे. स्मशानभूमीत संबंधिताचे नातेवाईक व मित्रमंडळी मृताचे नाव तसेच अन्य माहिती देतात. त्यावेळी पंधरा ते वीस लोकांनाच प्रवेश मिळेल, असे स्पष्टपणे सांगितले जात आहे. लोक त्यास प्रतिसाद देत आहेत.

गेल्या वर्षीही असेच नियम होते. मध्यंतरी अनलॉक झाल्यानंतर स्मशानभूमीत पूर्वीप्रमाणे गर्दी होऊ लागली. आता कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. शहर तसेच जिल्ह्यातील कोविड मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे कोणताही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पीपीई किट घालूनच अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

सीपीआर, खासगी रुग्णालयात किंवा ग्रामीण भागात कोविडने मृत्यू झाल्यास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येथे आणला जातो. मुख्य स्मशानभूमीत नॉन कोविड मृतदेहांसाठी बेड राखीव आहेत. कोविड तसेच नॉन कोविड मृतदेहांसाठी डिझेल दाहिनीचा वापर केला जातो. 
मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन करण्याचे आवाहन केले जात आहे. काही कारणांमुळे रक्षाविसर्जन खोळंबून राहिल्यास अन्य मृतदेहांसाठी जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे ही सूचना करण्यात आली आहे. 

शेणींचा पुरेसा साठा
गेल्या वर्षी कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाल्याने शेणी तसेच लाकडाचा तुटवडा जाणवू लागला होता. यंदा मात्र होळीच्या दिवशी तब्बल पाच लाख शेणी दान झाल्या. परिणामी शेणी तसेच लाकडाचा सध्या पुरेसा साठा आहे. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला उडवणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Pune Cyber Crime: बनावट अटक वॉरंट, व्हिडिओ कॉल आणि धमक्या; पुण्यातील वृद्ध महिलेची 32 लाखांची फसवणूक

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

SCROLL FOR NEXT