Rani Channama University appeals to students to fill up examination forms through the Student Portal 
कोल्हापूर

राणी चन्नमा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी असे भरा परीक्षा अर्ज....

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाने स्टूडंट पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. 5 मेपासून पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा करून देण्यात आली असून विनादंड 20 मे पर्यंत अर्ज भरावयाचा आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांची एक प्रत विद्यापीठातील आपल्या विभागात सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.

विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एम. ए., एम. कॉम, एमएड, एमएसडब्ल्यू, एम.लीब, एमपीएड, एमएससी, एमबीए, एससीए, एमएससी, पीजी डिप्लोमा, सर्टिफीकेट कोसच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे आहेत. दुसरी, चौथ्या व सहाव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरणा करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्ज शुल्क 80 रुपये, मार्क कार्ड शुल्क 120 रुपये, प्राजेक्‍ट, व्हायवा शुल्क 600 रुपये (पात्र असेल तर), पासींग सर्टिफीकेट 180 रुपये (अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी) असणार आहे.

एम.ए. एम. कॉम, ए.एड व एमएसडब्ल्यूच्या नियमीत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 960 रुपये, फेरपरीक्षा देणाऱ्या (रिपिटर्स) विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पेपरसाठी 360 रुपये व जास्तीत जास्त 960 रुपये अर्ज शुल्क आहे. बीलीब, एमपीएड, एमएससीच्या विद्यार्थ्यांसाठी 1080 रुपये, रिपिटर्स विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी 360 रुपये व जास्तीत जास्त 1080 रुपये. बीबीए व बीसीएच्या विद्यार्थ्यांसाठी 1800 रुपये, रिपिटर्स विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी 360 रुपये व जास्तीत जास्त 1800 रुपये. एमएससीच्या विद्यार्थ्यांसाठी 1440 रुपये, रिपिटर्स विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी 360 रुपये व जास्तीत जास्त 1440 रुपये. पीजी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी 1080 रुपये, रिपिटर्स विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी 300 रुपये व जास्तीत जास्त 1080 रुपये. सर्टिफीकेट कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी 480 रुपये, रिपिटर्स विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी 240 रुपये व जास्तीत जास्त 480 रुपये परीक्षा शुल्क आहे.

बीपीएडच्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांची अर्ज शुल्क 80 रुपये आहे. मार्क्‍स कार्ड शुल्क 120 रुपये, परीक्षा शुल्क 1500 रुपये, रिपिटर्स विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी 300 रुपये व जास्तीत जास्त 1500 रुपये भरणा करायचा आहे. तसेच चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी 140 रुपये पासींग सर्टिफीकेट शुल्क असणार आहे. अधिक माहितीसाठी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT