Rankala Lake, Keshavrao Bhosale Natyagriha inspected by Minister Eknath Shinde 
कोल्हापूर

रंकाळा तलाव, केशवराव भोसले नाट्यगृहाची मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

डॅनिअल काळे

कोल्हापूर ः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रंकाळा तलाव आणि केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. या दोन्हीही कामासाठी राज्यशासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्याचे सादरीकरणही त्यांनी पाहिले. 14 कोटींच्या या आराखड्यासंदर्भात तसेच रंकाळा तलाव संवर्धनासाठी मुंबईत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले. 
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेत विविध विकासकामांची आढावा बैठक घेतली. नगरविकास मंत्री महापालिकेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुपारपर्यंत महापालिकेत आढावा बैठक घेतल्यानंतर सायंकाळी त्यांनी पहिल्यांदा रंकाळा तलाव येथे भेट दिली. पर्यटनस्थळ म्हणून रंकाळा तलाव व परिसर विकसित करण्यासोबतच रंकाळा संवर्धन आणि जतन करण्यासाठी जो निधी लागेल, तो देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. महापालिकेने तसा एकत्रित प्रस्ताव दिला आहे. 
केशवराव भोसले नाट्यगृह ऐतिहासिक आहे. त्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या नाट्यगृहाला पहिल्या टप्प्यात दहा कोटींचा निधी मिळाला होता. त्यातून या नाट्यगृहात विविध कामे केली आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात आणखीन काही कामांचा समावेश आहे.14 कोटींचा हा आराखडा आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी महापालिकेने केली. या दोन्हीही कामासंदर्भात मुंबईत स्वतंत्र बैठक घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी दिले. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.

-संपादन - यशंवत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : भारतीय मिचेल स्टार्क! ३० लाखांवरून पोहोचला थेट ८.४० कोटी; कोण आहे Auqib Nabi? पाहा गोलंदाजीचा Video

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात बंद; रुपयाच्या कमजोरीने बाजारात दबाव; वेदांताचे शेअर्स मात्र तेजीत!

IPL 2026 Auction: काव्या मारनला हवा होता फिरकीपटू, पण राजस्थान रॉयल्सने ७.२० कोटी मोजून मारली बाजी; ठरला महागडा भारतीय

ठाकरे बंधुंच्या युतीचा मुहूर्त ठरला? 'या' तारखेला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, राज ठाकरे-संजय राऊतांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुलाला वाचवायला रक्ताचे नमुने बदलले, बाप दीड वर्षांपासून तुरुंगात; पोर्शे अपघात प्रकरणी हायकोर्टानं जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT