Sakarla attractive selfie point on the sidewalk; Youth crowd for photos 
कोल्हापूर

रंकाळा पदपथावर साकारला आकर्षक  सेल्फी पॉइंट; फोटोसाठी तरुणाईची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलाव काठाच्या पदपथावर सेल्फी पॉइंट साकारला आहे. नगरसेवक व कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या संकल्पनेतून पदपथावर लक्षवेधी व आकर्षक असा सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून येथे तरुण-तरुणींची सेल्फीसाठी गर्दी होत आहे. 
काही वर्षांत रंकाळा पदपथाची दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी पदपथ उखडल्याने रंकाळ्यावर दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांची कुचंबणा होत होती. पदपथाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 88 लाख रुपये मंजूर झाले होते. त्यातून दुरुस्ती करून पेव्हिंग ब्लॉक टाकले जात आहेत. रंकाळा परताळ्यानजीक पूर्वी ज्या ठिकाणी अर्ध वर्तुळाकार लोखंडी पूल होता, तो काढून त्या ठिकाणी नव्याने पदपथ बांधण्यात आला. पूर्ण वर्तुळाकार सेल्फी पॉइंट तयार केला आहे. इंग्रजीत कोल्हापूर अक्षरे लिहून संपूर्ण रंकाळा दिसेल, असा सेल्फी पॉइंट बनविला आहे. या ठिकाणी पदपथावर विविध आकारांतील सुंदर डिझाईनचे पेव्हिंग ब्लॉक बसविले आहेत. लक्षवेधी व आकर्षक सेल्फी पॉइंट झाल्याने येथे तरुण-तरुणींची 
सेल्फीसाठी गर्दी होत आहे. व्यावसायिक फोटोग्राफरला घेऊन अनेकजण रंकाळा काठावर आपले विविध पोझमध्ये फोटो काढत आहेत. 
दोन वर्षांपासून रंकाळ्याचे रूप बदलू लागले आहे. विविध विकासकामांद्वारे रंकाळ्याचे सुशोभीकरण केले जात आहे. 


रंकाळा हे ऐतिहासिक ठिकाण आहे. रंकाळा परिसर पर्यटन केंद्र बनवण्याच्या दृष्टीने विविध विकासकामे पूर्ण केली जात आहेत. 
-शारंगधर देशमुख, नगरसेवक. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT