kolhapur  sakal
कोल्हापूर

Kolhapur : रंकाळ्यात कासव, मासे झाले मृत

काठाला कचऱ्याचा ढीग; सांडपाणी तलावात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रंकाळ्यातील प्रदूषणाचा फेरा संपत नसून आज संध्यामठजवळ छोटे कासव व काही मासे मेल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. वाऱ्यामुळे ते कासव काठावर आले नाही. गेल्या महिन्यातही मोठ्या प्रमाणात मासे मेले होते.

पाऊस सुरू असल्याने नाल्यातील पावसाच्या पाण्यासह सांडपाणीही रंकाळा तलावात सोडले जात होते. गेल्या महिन्यात राजघाटापासून संध्यामठ, तांबट कमान, जलसंपदा विभागाजवळ मोठे मासे मेल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकून मेलेले ते मासे होते असे सांगण्यात आले. त्यानंतर शाम सोसायटीचा तसेच देशमुख हॉलजवळील नाला अडवण्यात आला. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पुन्हा नाल्यातील पाणी सोडण्यात आले.

आज सकाळी शिवाजी पेठेतील नागरिकांना संध्यामठपासून तांबट कमानीपर्यंत रंकाळ्यात मेलेले मासे दिसून आले. काठाजवळ अगदी मोजके मासे असले तरी आत त्याची संख्या जास्त होती, असे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. या माशांबरोबरच मेलेले एक छोटे कासवही तरंगत होते. स्थानिकांनी काठ्यांच्या मदतीने कासवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. वाऱ्यामुळे लाटा निर्माण होत असल्याने मेलेले मासे व कासव काठावर आले नाहीत.

रंकाळ्यात संध्यामठजवळ प्रचंड कचरा जमा झाला आहे. त्यात प्लास्टिकच्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या, नारळ तसेच इतरही कचरा आहे. गणेशोत्सवानंतर महापालिकेने इराणी खाणीची स्वच्छता करण्यात आली. कालच ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रस्त्यांवरीलही कचरा उठाव करण्यात आला. मात्र, रंकाळ्यातील कचरा काढलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT