rape on girls in kolhapur shahuwadi 
कोल्हापूर

आई-वडील शेतात गेल्याची संधी साधून बालिकेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

शाहूवाडी - शाहूवाडी तालुक्‍यात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. त्याप्रकरणी पोलिसांनी शाहूवाडी तालुक्‍यातीलच यशवंत बापू नलवडे (वय ५५) याला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्याविरोधात पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पीडित बालिकेच्या आईने दिली आहे. 
या प्रकाराने शाहूवाडी तालुका हादरला आहे. संबंधित बालिकेवर मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून बालिकेला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर अधीक्षक तिरुपती काकडे, विभागीय अधिकारी प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. त्यांनी शाहूवाडी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. पोलिस निरीक्षक अनिल चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रियांका सराटे तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संबंधित बालिकेचे आई-वडील व आजोबा शेतात गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास संबंधित बालिका नलवडेच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी नलवडेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, आई-वडील व आजोबा घरी आले. त्यावेळी बालिकेची अवस्था पाहून पालक हादरले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधत फिर्याद दिली.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT