कोल्हापूर

राशिवडे बुद्रुक येथे दोन बालकांना मारहाणकरून डांबून घातले

प्रतिनिधी

राशिवडे बुद्रुक : येथील दोन बालकांना अज्ञात व्यक्तीने हातपाय बांधून मारहाण करून पडक्‍या घरात डांबून घालण्याचा प्रकार घडला. सतेज राजेंद्र फराकटे (वय 15) व प्रांजल संजय फराकटे (वय 4) अशी या बहीण-भावांची नावे आहेत. हा प्रकार कुणी व का केला यामागचे रहस्य गुलदस्त्यात असून याबाबत उलटसुलट चर्चा आहे. 
आज दुपारी या दोघाना हात, पाय बांधुन राहत्या घरासमोरील त्यांच्याच जुन्या घरात डांबुन घातल्याचे आढळले. पैकी सतेजला जखमी व बेशुद्धावस्थेत 108 रुग्नवाहीकेने कोल्हापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. उपचार सुरु आहेत. 
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, गुरव गल्लीतील या फराकटे कुटुंबातील काहीजण शेताकडे गेले होते. घरात लहान मुलांसह काही महिला होत्या. दारात सतेज व प्रांजल खेळत होते. या दरम्यान अज्ञात व्यक्तीनी प्रथम सतेजला बोलाविले व त्यानंतर त्याची बहीण प्रांजल पाठोपाठ गेली. जुन्या घरामध्ये या दोन बालकांना हातपाय बांधुन घालुन मारहाण केली व घराला बाहेरुन कडी घालुन या व्यक्ती निघुन गेल्या. दुपारी चारच्या सुमारास दाराला धडक मारण्याचा आवाज ऐकु आल्याने जवळच असणाऱ्या लोकांनी दरवाजा उघडला असता यांना बांधुन घातल्याचे दिसुन आले. या दोघांच्या अंगाला मुंग्यांनी चावा घेतला होता. त्यामुळे बेशुध्द अवस्थेत त्यांना राशिवडेतील खाजगी दवाखान्यात तर त्यानंतर 108 अँम्ब्युलन्समधुन कोल्हापूरातील खाजगी हॉंस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शाहुपुरी पोलीसांनी हॉंस्पिटलमध्ये भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहीती घेतली. मात्र हा प्रकार नेमका काय आहे हे पुढे आलेले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT