Ration shopkeepers are likely to mess up. This allegation was made by former MLA Suresh Halvankar 
कोल्हापूर

रेशन वाटपात गडबड होण्याची शक्यता ; भाजपाच्या 'या' माजी आमदारांनी केला आरोप...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - तीन पक्षाच्या सरकार मध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही. केंद्र सरकारने दिलेले धान्यरुपी मदत वितरित करताना, रेशन दुकानदार गडबड करण्याची शक्यता आहे. त्यांना सरकारचा पाठिंबा आहे. असा आरोप माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला. त्यामुळेच भाजप कार्यकर्ते रेशन दुकानासमोर लोकांच्या माहितीकरता फलक घेऊन उभारणार आहेत. असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या 1 वर्षातील कामाचे माहिती सांगण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते बोलत होते. कोरोना काळातील मदतीबाबत बोलताना हळवणकर म्हणाले, 'लॉकडाउनच्या काळात कष्टकऱ्यांना अन्नधान्याची कमतरता भासू नये. यासाठी केंद्र सरकारने माफक किमतीमध्ये धान्य उपलब्ध करून दिले. या धान्य वाटपामध्ये रेशन दुकानदार गडबड करण्याची शक्यता आहे. त्यांना सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळेच पत्रकारांनी यावर लक्ष ठेवावे. लोकांना नेमकी किती धान्य किती किमतीला दिले जाते याची माहिती होण्यासाठी, भाजप कार्यकर्ते रेशन दुकान समोर फलक घेऊन उभे राहतील. राज्य सरकारने ऑनलाईन तक्रारी ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा उपयोग करावा व आपली तक्रार नोंदवावी.

या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे, जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिकोडे, माजी आमदार अमोल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप किसान आघाडी प्रमुख भगवान काटे, सरचिटणीस हेमंत आराध्ये हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT