Kidnaping Esakal
कोल्हापूर

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिस्तुलाच्या धाकाने अपहरण

नरसिंहगाव तालुका कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

शिरढोण : नरसिंहगाव तालुका कवठेमहांकाळ येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन मोटर सायकल वरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी सांगली येथील दोघांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत अपहरण केले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तीन लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. हा प्रकार मंगळवारी (ता.10) रोजी सायंकाळी घडला. याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,

गणेश साबू मादीकर (वय 36 राहणार शंभर फुटी रोड डी-मार्ट जवळ) हे एका कंपनीत वसुलीचे काम करतात. चालक राजाराम शिंदेला घेऊन ते मंगळवारी जत, कवठेमहांकाळ तालुक्यात आले होते. सायंकाळी वसुलीची रक्कम घेऊन चार चाकी गाडी (एमएच 10 डीएल 9648) घेऊन ते निघाले होते.

अज्ञात चार चोरट्यांनी दोघांना चाकूचा धाक दाखवत अपहरण करून लुबाडले

सायंकाळी कवठेमहांकाळ येथील नरसिंह गावाजवळ आले तेव्हा दोन मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात चार चोरट्यांनी त्यांना अडवले. चालक राजाराम शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गणेश मादीकर व शिंदे या दोघांना चाकूचा धाक दाखवत नरसिंहगाव पासून नागज, आरेवाडी, नांगोळे,सलगरे रस्त्यावरून नेले. त्यानंतर बेडग ते कवठेमहांकाळ या निर्जन चोरट्यांनी तीन लाख एक हजार 200 रुपये काढून घेतले. त्यानंतरअंधारात दोघांना सोडून दिले. मादीकर यांनी याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT