read on beer bar in ichalkaranji 
कोल्हापूर

ड्राय डेला ओबी बीअर बार ‘फुल्ल’;दारू, शस्त्रे जप्त; आठ जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी -  येथील गांधी कॅम्पनजीक असलेल्या ओबी बीअर बारवर आज रात्री पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या पथकाने छापा टाकला. ड्राय डे असताना बार सुरू होता.

कारवाईत ६८ हजार ५८० रोकड, मद्यसाठा यासह तलवार, जांबिया व कटर अशी शस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी बारमालकासह आठ जणांना गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी बार मालक ओंकार अरूण बडवे (वेताळ पेठ) यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतले. व्यवस्थापक उद्धव शिवाजी निकम (सरस्वती मार्केट), संदीप संजय पाटील (महासत्ता चौक), राहूल राजाराम कांबळे (खंजीरे अपार्टमेंट), शहारुख जब्बार समडोळे (मंगळवार पेठ), हणमंत रामचंद्र वाळवेकर (कलानगर), संपत गंगाधर शिंगाडे, अमित तानाजी लगारे (दोघेही राहणार वेताळ पेठ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

येथील गांधी कॅम्पनजीक ओबी बार आहे. आज महात्मा गांधी पुण्यदिन असल्यामुळे शासनाकडून ड्राय डे जाहीर केला होता. त्यामुळे मद्यविक्रीस मनाई होती. मात्र ओबी बार सुरू असल्याची माहिती महामुनी यांना मिळाली. त्यानुसार पथकांने बारवर रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकला.

कारवाईमुळे खळबळ उडाली. कांही वेळातच गावभाग पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मद्यसाठा जप्त करतांना तेथे एक तलवार, जांबिया व कटर सापडले. ही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. याशिवाय ६८ हजार ५८० रोकड, तीन मोबाईल, डीव्हीआरसह बीअर व मद्यसाठा असा सुमारे एक लाखापेक्षा जास्त मुद्देमाल 
जप्त केला.
 
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Kandivali Fire: कांदिवलीत आगीची घटना, धुराने भरलेल्या व्यावसायिक इमारतीतून ११ जणांची सुटका; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण

High Court Clerk Exam: ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी; संतप्त उमेदवारांचा साडेबारा तास ठिय्या, न्यायालयाची लिपिक भरती

Pune Railway: पुणे रेल्वे स्थानकावर मोठा बदल! जनरल प्रवाशांना थेट फलाटावर जाता येणार नाही; २२ कोटींचे होल्डिंग एरिया तयार

Marathi News Live Updates : पालघरच्या बोईसर MIDC मधील कंपनीत स्फोट, काही कामगार जखमी

SCROLL FOR NEXT