read massage center in Belgaum crime news 
कोल्हापूर

बेळगावात युनीसेक्‍स स्पा मसाज सेंटवर छापा ; चार युवतींची सुटका 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार चालविणाऱ्या टिळकवाडी येथील न्यू गेट वे युनीसेक्‍स स्पा मसाज सेंटवर छापा टाकून तिघा युवतींची सुटका करण्यात आली. शनिवार (ता.6) सायबर इकनॉमिक्‍स नार्कोटिक्‍स (सीईएन) पोलिसांनी हा छापा टाकला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. प्रकाश कन्नप्पा येळ्ळूरकर (वय 27, रा. मराठा कॉलणी टिळकवाडी), विनायक केदारी शिंदे (वय 37, रा. मरगाई गल्ली जुनेबेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. 

टिळकवाडी दुसरे गेटनजिकच्या नेलसन हैट्‌स या अपार्टमेंटमध्ये असलेल्या न्यू गेट वे युनीसेक्‍स स्पा मसाज सेंटवर मसाजच्या नावाखाली अनैतिक कृत्य चालविण्यात येत आहे. अशी खात्रीलायक माहिती सीईएन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचुन छाटा टाकला असता त्याठिकाणी तीन युवती आढळून आल्या. त्यामुळे त्यांची पोलिसांनी सुटका करुन वरील दोघा संशयितांना अटक केली. संशयितावर सीईएन पोलिस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करुन घेऊन जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. सीईएन पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे पोलिस आयुक्‍त डॉ. के. त्यागराज, उपायुक्‍त डॉ. विक्रम आमटे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक करुन बक्षिस जाहिर केले आहे. 

मसाज सेंटरना यापुढे कडक निर्बंध 
ेशहरात सुरु असलेल्या सर्व मसाज सेंटरचालकांनी परवाना पत्र आणि सीसीटीव्ही बसविणे सक्‍तीचे आहे. सेंटरमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती देणे गरजेचे आहे. कोणत्याही कारणारुन मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार चालविण्यात येऊ नयेत. अनैतिक कृत चालविणाऱ्या मसाज सेंटरविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

टिळकवाडीतील न्यू गेट वे युनीसेक्‍स स्पा मसाज सेंटवर छापा टाकून पोलिसांनी सर्वत्र तपासणी केली. यावेळी पोलिसांना तिघा युवतींसह अन्य काही अक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास चालविला आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT