Reading Of Dnyaneshwari From House To House At Nagve Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

नागवे येथे घरा-घरांत ज्ञानेश्‍वरीचे वाचन

सकाळवृत्तसेवा

चंदगड : नागवे (ता. चंदगड) येथे यावर्षीचा ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा सामुदायिकपणे साजरा न करता प्रत्येकाने आपापल्या घरातच ज्ञानेश्‍वरीचे वाचन करावे, असा निर्णय झाला आहे. त्यानुसार आजपासून पारायणात सहभागी झालेल्यांनी आपापल्या घरात वाचनाला सुरवात केली. सुमारे चाळीस वर्षांच्या परंपरेत प्रथमच असा प्रसंग आला आहे. 

कोरोनाने सर्वच व्यावहारिक अंगांना विळखा घातला आहे. सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे असल्याने विविध धार्मिक, कौटुंबिक उत्सवांना मर्यादा आली आहे. लग्न कार्यालयातही किती लोक असावेत, याची मर्यादा घालून दिली आहे. या विभागात दरवर्षी ठरलेल्या तिथीनुसार गावात ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते.

धार्मिक, आध्यात्मिकदृष्ट्या त्याचे महत्त्व आहेच, परंतु या निमित्ताने गावातील विविध जाती-धर्मांचे लोक एकत्र येतात. गावचे सामाजिक वातावरण सुसंवादी होते. या निमित्ताने पारायण सोहळ्याच्या कालावधीत दररोज भजन, कीर्तन, प्रवचन होतात, परंतु या वर्षी कोरोनाने या सर्व नियोजनाला खीळ घातली आहे. लोकांची गर्दी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी सामुदायिक सोहळ्याऐवजी घराघरांत ज्ञानेश्‍वरीचे वाचन करण्याचा उपाय सुचवला आणि त्याला नागरिकांनीही प्रतिसाद दिला. 

प्रसादही घरीच 
दरम्यान, आजपासून सोहळ्याला सुरवात झाली. अनेकांनी घरातच ठरल्यानुसार ज्ञानेश्‍वरीचे अध्याय वाचून पूर्ण केले. 19 तारखेला या सोहळ्याची सांगता होणार आहे. तीसुद्धा आपापल्या घरीच प्रसाद करून साजरी करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

Kagal-Peth Naka Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते पेठ नाक्यावर कोंडी कायम; मुदतवाढ देऊनही काम अपूर्णच, 51 टक्के कामानंतर जुना ठेका केला रद्द

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT