Regarding Corona, this village will be a pilot project in Kolhapur district 
कोल्हापूर

कोरोनाबाबत हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात राबवणार पथदर्शी प्रकल्प

सुनील पाटील

वडणगे ः जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी करवीर तालुक्‍यातील वडणगे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या गावातील रुग्णाला त्याच्या घरीच अलगीकरणात ठेवून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने हा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. 
सरपंच सचिन चौगले, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डॉ. संदीप पाटील यांनी गावातील डॉक्‍टरांशी याबाबत व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे चर्चा केली आहे. संबंधित रुग्ण गावातील डॉक्‍टराच्या देखरेखीखाली असेल. संबंधित डॉक्‍टर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे त्या रुग्णाला मार्गदर्शन करून औषधे देणार आहे. डॉक्‍टरांनी सांगितलेली औषधे ग्रामपंचायतीच्या वतीने दिली जाणार आहेत. गावातील 12 ते 15 डॉक्‍टरांनी अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. घरी अलगीकरणाची सोय नसलेल्या रुग्णांसाठी शाळेत कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. याठिकाणी दहा बेडची व्यवस्था केली जाणार आहे. 

पालकमंत्री सतेज पाटील,कोल्हापूचे  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. घरातील रुग्णाला ऑक्‍सीमीटर व थर्मल स्कॅनर दिली जाईल. संबंधित रुग्णाच्या संपर्कात न येता स्थानिक स्वयंसेवक किंवा प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांकडून अंमलबजावणीची पाहणी होईल. गावातील डॉक्‍टरांना मार्गदर्शन तसेच या संपूर्ण प्रक्रियेचे नियंत्रण डॉ. संदीप पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. 
- सचिन चौगले, सरपंच वडणगे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT