कोल्हापूर

चार महिन्यांनी आरटीओतील  लायसन्स विभाग नियमित 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : कोरोना महामारीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) 18 मार्चपासून अनियमित वाहनचालक परवाना देण्याची प्रक्रिया नियमित झाली आहे. पुनर्रचना करून लॉकडाउनमधील प्रलंबित परवाने देण्याची प्रक्रिया ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपली आहे. त्यानंतर आता नवीन वाहन चालविण्याचा परवाना काढणे, कच्चा परवाना पक्का करणे नियमित सुरू झाले आहे.  कोरोना महामारीचा फटका प्रादेशिक परिवहन कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या वाहन चालक परवान्यालाही बसला. परवाना काढताना ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्यामुळे लॉकडाउनमधील ज्यांची अपॉईंटमेंट होती, त्यांची पुनर्रचना करून पुढील कालावधी दिला होता. दरम्यानच्या काळात अपॉईंटमेंट बंद केल्या होत्या. आता रोज पक्के परवाने 150, तर कच्चे 70 परवाने दिले जात आहेत. 


परवाने काढताना सोशल डिस्टन्स राहावा, यासाठी नेहमी सकाळी 10 वाजता सुरू होणारी प्रक्रिया सकाळी नऊपासून सुरू केली आहे. जादा वेळ थांबून दिवसभरातील अपॉईंटमेंट पूर्णच केल्या जातात. कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू असल्यामुळे नियमितता आली आहे. नव्या अपॉईंटमेंटही सुरू केल्या आहेत. 
- प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT