कोल्हापूर

जिल्ह्यात 10 आरोग्य उपकेंद्रांचे स्थलांतर लटकले 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या 10 आरोग्य संस्थांचे स्थलांतरण करण्याचे आदेश दिले आहेत. यात भुदरगड व राधानगरी प्रत्येकी 3, हातकणंगले, शाहूवाडी येथील प्रत्येकी एक तर शिरोळ येथील 2 संस्थांचा समावेश आहे. सहा महिन्यांपूर्वीच हे आदेश दिले आहेत, मात्र या सर्व स्थलांतरासाठी मान्यतांचे अनेक टप्पे आहेत. ते पूर्ण केल्याशिवाय हे स्थलांतर होणे शक्‍य नाही. त्यातच कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे, आरोग्य यंत्रणाही हतबल आहे. त्यामुळे स्थलांतराचा निर्णय आणखी काही दिवस तरी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. 
दोन वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्यांकडून 10 आरोग्य संस्थांच्या स्थलांतराची मागणी होत आहे. सध्या ज्या गावात या आरोग्य संस्था आहेत, त्या ठिकाणी अन्य पर्यायी व्यवस्था झाली आहे. शिरोळ, हुपरी या ग्रामपंचायतीचे तर नगरपालिकेत रूपांतर झाले आहे, तर कुरुंदवाडपासून जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गरजेच्या ठिकाणी ही आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने या स्थलांतराचे प्रस्ताव देण्याची सूचना केली होती, मात्र हे प्रस्ताव देताना ग्रामपंचायतीपासून ते राज्य शासनापर्यंत त्याची मान्यता घ्यावी लागणार असल्याने, सहा महिने हा विषय कागदाच गुरफटला आहे. 
सध्या जिल्ह्यात कोरोनाचे सावट आहे. मार्चपासून आजपर्यंत रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील दीड ते दोन महिने ही संख्या अशीच वाढत जाईल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठीच वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे आहे ती यंत्रणा इतर कुठेही न हलवण्याचे धोरण आरोग्य


आरोग्य यंत्रणांचे स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद आरोग्य समिती, स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मान्यता घेउन हा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला जातो. त्यामुळे या प्रक्रियेस विलंब होत आहे, तर दुसरीकडे कोरोनाचे संकट आले असून, त्यासाठी वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आहे, त्याच ठिकाणी काही काळ ठेवून स्थलांतरित जागेच्या ठिकाणी दोन तास ही वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा विचार होतो. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना

प्रीपेड वीजबिल वसुलीची ‘सरकारी एन्ट्री’! वीजजोडण्या बदलण्यास ऊर्जा विभागाची मंजुरी

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेकरूंना मोठे गिफ्ट! १३ वर्षांनंतर रामबाडा-गरुडचट्टी मार्ग 'रेडी'; आपत्तीच्या काळात ठरणार 'लाईफलाईन'!

SCROLL FOR NEXT