Remdesivir injection is currently scarce in the  kolhapur district
Remdesivir injection is currently scarce in the kolhapur district 
कोल्हापूर

रेमडेसिव्हिरचा तुटवडा : सिप्ला ॲक्‍टमेरा पर्याय ठरेल रेमडेसिव्हिरला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना बाधित रुग्णांना वरदान ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा जिल्ह्यात सध्या तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर खरेदी केल्याने हा तात्पुरता तुटवडा झाला आहे. पुढील दोन दिवसांत हा पुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती रेमडेसिव्हिरचा पुरवठा करणाऱ्या वितरकांनी दिली. 

रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, की त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले जाते. ऑक्‍सिजन, रक्त पातळ होण्यासाठी गोळ्या (हिपॅरीन), स्ट्रीरॉईड, कार्पप्रोटोकॉल (रुग्णाला काही कालावधी पोटावर झोपवणे) अशा पद्धतीने रुग्णावर उपचार केले जातात. 


दरम्यान, रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन सलाईनमधून दिले जाते. १४ दिवसांच्या कालावधीत ६ इंजेक्‍शन द्यावे लागतात. सुरवातीला ही इंजेक्‍शन जिल्हा परिषदेच्या औषध भांडारात मिळत होती, मात्र नंतर तेथील विक्री बंद केली. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन माफक किमतीत सर्व औषध दुकानात मिळेल, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सुरवातीला काही दिवस या इंजेक्‍शनचा पुरवठा मागणीप्रमाणे सुरू होता; मात्र चार दिवसांत हा पुरवठा थांबला. 
कारण राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्वाधिक रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन बनवणाऱ्या हेट्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणात इंजेक्‍शन खरेदी केले. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा झाला, मात्र पुढील दोन दिवसांत पुन्हा पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, असे कंपनीने सांगितले आहे. 

...तर सिप्ला ॲक्‍टमेरा
सिप्ला ॲक्‍टमेरा हे इंजेक्‍शनही कोरोना रुग्णाला दिले जाते. याची किंमत ४० ते ४२ हजार रुपये आहे. रेमडेसिव्हिर देऊनही रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, तर सिप्ला ॲक्‍टमेरा हे इंजेक्‍शन दिले जाते.


रेमडेसिव्हिर 
कंपनी    ब्रॅंड    किंमत 
हेट्रो    कोव्हीफर    ५४००
सिप्ला    सिप्रेमी    ४,०००
ज्युबिलो    ज्युबिआर    ४,८००

ज्या रुग्णांचा एच.आर.सी.टी. स्कोर १५ ते ३० आहे किंवा ऑक्‍सिजन पातळी ८५ ते ९३ आहे, अशा रुग्णांना रेमडेसिव्हिरवर हे उपयोगी ठरते. काही जणांना लक्षणे नसतात, पण टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, अशा रुग्णांनाही रेमडेसिव्हिर दिले जाते. कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी रेमडेसिव्हिर महत्त्वाचे आहे. 
- डॉ. अक्षय बाफना, हृदयरोग तज्ज्ञ. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडेसिव्हिरची मागणी वाढली आहे. मात्र, चार दिवसांपूर्वी शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिरची खरेदी केल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादन पूर्ववत होऊन लवकरच पुरवठा पूर्वीसारखा होईल. निर्धारित दरापेक्षा अधिक दराने रेमडेसिव्हिरची विक्री करू नये. जर कोणी करत असेल, तर असोसिएशनला याची माहिती द्यावी. 
- मदन पाटील, अध्यक्ष, जिल्हा केमिस्ट असोसिएशन.

संपादन - अर्चना बनगे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT