the report of corona patients positive in private hospital and negative in public hospital in kolhapur 
कोल्हापूर

पॉझिटिव्ह-निगेटिव्हच्या गोंधळात नातेवाईक संभ्रमावस्थेत

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : एकाच रुग्णाचा अहवाल खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आणि सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह आला. तरीही त्या महिलेला सीपीआरच्या कोविड कक्षात ठेवण्यात आले. यावेळी आमचा रुग्ण निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये का ठेवला, असा सवाल नातेवाईकांनी केला. मात्र खासगी लॅबमध्ये झालेली चाचणीच योग्य असल्यामुळे त्या महिलेस कोरोना पॉझिटिव्ह विभागात ठेवल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले. 

पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अहवालामुळे नातेवाईकांत कशी संभ्रमावस्था होते, याचे हे एक जिवंत उदाहरण नगरसेवक नियाज खान यांच्या माध्यमातून ‘सकाळ’च्या हाती आले आहे.
मोरेवाडी ग्रामपंचायत सदस्याच्या या चाचणीमुळे खासगी आणि शासकीय चाचणीतील तफावत समोर आली. असाच प्रकार जवाहरनगरात पुढे आला. 

५४ वर्षीय महिलेला पोटदुखीवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यापूर्वी खासगी लॅबमध्ये तपासणी केली. अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांनी त्याच दिवशी आयसोलेशनमध्येही स्वॅब दिला. त्यांचा अहवाल दुसऱ्या दिवशी निगेटीव्ह आला. तरीही त्या सीपीआरमध्ये कोरोना कक्षात आहेत. आज तीन दिवस होऊन ही त्यांची स्थिती आम्हाला समजत नाही, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांना कोणीही दाद देत नसल्याने स्थानिक नगरसेवक नियाज खान यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोचली. रुग्णांवर योग्य उपचारासाठी नगरसेवक नियाज खान प्रयत्न करीत आहेत. 

दरम्यान कोविड कक्षात निगेटीव्ह रुग्ण ही बाब गंभीर होती. त्यामुळे पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह असे दोन्ही अहवालाची वस्तूस्थिती आम्ही जाणून घेतली. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठांतांशी संपर्क साधला असता त्यांनी तो टाळला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यांना गांभीर्य लक्षात आले. त्यांनी माहिती घेऊन ती महिला पॉझिटीव्हच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच तिला सीपीआरला ठेवल्याचे स्पष्ट केले.

सखोल चाचणी महत्त्वाची

खासगी लॅबमध्ये केलेली चाचणी ही सविस्तर होती. ती करण्यासाठी सुमारे साडेपाच तास लागतात. त्यामध्ये महिला ‘पॉझिटीव्ह’ आहे. या चाचणीला ‘पीसीआर’ असे म्हणतात. तर आयसोलेशन मध्ये केलेली चाचणी ही केवळ पंधरा मिनिटांची वरवरची होती. त्यामध्ये महिला ‘निगेटीव्ह’ आली आहे. या चाचणीला ‘एटीसी’ असे म्हणतात. त्यामुळे खासगी लॅब मधील चाचणी योग्य असल्यामुळे महिलेस सीपीआरच्या कोरोना विभागात ठेवल्याचे तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. ‘पीसीआर’ करण्यापूर्वी ‘एटीसी’ची चाचणी करतात. मात्र येथे उलटे झाल्यामुळे हा सावळा गोंधळ झाला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT