Republic Day A Manly Game in Kolhapur City Kolhapur Marathi News
Republic Day A Manly Game in Kolhapur City Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

Republic Day : या प्रजासत्ताक दिनी दांडपट्ट्याद्वारे तरुण करणार अजब करामत...

अर्चना बनगे

कोल्हापूर :  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येत्या रविवारी याठिकाणी मर्दानी खेळाचा एक नवा विक्रम होणार आहे. दांड पट्टाच्या साह्याने एका तासात तब्बल चार हजार लिंबू कापण्याचा विक्रम मावळा गफूर रेहाना मुजावर हा युवक करणार आहे.छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल मंगळवार पेठ या ठिकाणी सकाळी आठ वाजता या उपक्रमास सुरुवात होणार आहे. 

कोल्हापूर आणि मर्दानी खेळ याचे वेगळे नाते आहे. कुस्ती बरोबरच या ठिकाणी खेळला जाणारा दांडपट्टा याचीही मोठी ख्याती आहे. परदेशी पाहुणे कोल्हापुरातील दांडपट्ट्याचा खेळाचे प्रात्यक्षिक पाहून थक्क होतात. यातूनच अनेक शालेय विद्यार्थी व युवक या खेळाकडे वळले आहेत. शांतिदूत मर्दानी आखाडा यामाध्यमातून अभियंता असलेले सुरज केसरकर यांनी  अशा खेळाडूंना तयार करण्याचा वसा घेतला आहे. 

सात वर्षांचा अथक प्रयत्न

 दीडशेहून अधिक  मुले त्यांच्याकडे सध्या सराव करतात . दांडपट्टा कडे आकृष्ट झालेला मावळा येथील शांतिदूत मर्दानी आखाडा संकुलात सराव करू लागला. सात वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर तो आता एक नवा विक्रम करण्यास सज्ज होत आहे. यापूर्वी 2008 मध्ये जोतिबा डोंगर या ठिकाणी लखन जाधव यांनी 56 मिनिटात 3802 लिंबू कापण्याचा विक्रम केला आहे.  हा विक्रम मोडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे त्यासाठी गेली पाच महिने तो सहा ते सात तास सराव करत आहे.

प्रजासत्ताक दिनी काेल्हापुरकर अनूभवणार...

या सरावानंतर मावळ्याचा आत्मविश्वास वाढला आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी हा विक्रम करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी प्रचंड प्रेम आहे. त्यातूनच त्याने मर्दानी खेळ शिकण्याचा निर्णय घेतला आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तो या खेळात तरबेज झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी प्रेम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मला लहानपणापासून प्रेम आणि आदर वाटतो. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा विक्रम करण्याचा मी मानस केला आहे.
 गफूर रेहान मुजावर,  मावळा

दांडपट्ट्याने लिंबू कापण्याचा उपक्रम

गेली सात वर्षांपासुन दीडशेहुन अधिक विद्यार्थ्यांना हा खेळ शिकवत असताना अनेक उपक्रम केले आहेत. मात्र येत्या प्रजासत्ताक दिनी मर्दानी आखाड्याच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त दांडपट्ट्याने लिंबू कापण्याचा उपक्रम करणार आहोत.
सुरज केसरकर, प्रशिक्षक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT