Request To The Minister For The Location Of The Sports Complex At Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजमधील क्रीडा संकुलाच्या जागेसाठी मंत्र्यांना साकडे

अवधूत पाटील

गडहिंग्लज : क्रीडा प्रेमींनी शहरात क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी जागाही सुचविली आहे. त्यासाठीचे शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना साकडे घातले. गडहिंग्लज दौऱ्यावर आलेल्या मुश्रीफ यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. 
शहरातील क्रीडापटुंना क्रीडांगणाचा प्रश्‍न आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी शेतीशाळेसाठी दिलेली व सध्या वापराविना असलेली वडरगे मार्गावरील जागा सुचविण्यात आली आहे.

या जागेसाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, क्रीडा प्रेमींनी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुश्रीफ यांनी त्याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांना सूचना दिल्या. ज्येष्ठ फुटबॉलपटू अर्जुन चौगुले, आणाप्पा गाडवी, एम. एस. बोजगर, रफिक पटेल, अरविंद बारदेस्कर, सुरेश दास, विनायक नाईक, अनिल पाटील, रमजान अत्तार, सुनीता नाईक, हरुण सय्यद यांच्यासह क्रीडाप्रेमींनी हे निवेदन दिले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT