research on dangerous of cancer avoid night time by prashant patil in kolhapur 
कोल्हापूर

कर्करोगाचा धोका टाळता येणे शक्‍य ; ‘नॅनो बायो मटेरियल बेस्ड सेंसर’मध्ये डॉ. पाटील यांचे संशोधन

नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर : प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाल्यास त्याच्यावर वेळीच उपचार करून रुग्णाला कर्करोगमुक्‍त करता येणे शक्‍य होते, यासाठी प्राथमिक अवस्थेतच कर्करोगाचे निदान करणारे सेंसर निर्मितीबाबत कोल्हापूरच्या डॉ. प्रशांत पाटील यांचे संशोधन सुरू आहे. ‘नॅनो बायो मटेरियल बेस्ड सेंसर’ या त्यांच्या संशोधनाला यश येताच कर्करोगाचा धोका वेळीच टाळता येणे शक्‍य होणार आहे. संभाव्य कर्करोग रुग्णांच्या दृष्टीने हे संशोधन वरदान ठरणार आहे.

डॉ. पाटील यांना या संशोधनासाठी भारत सरकारच्या सायन्स अँण्ड टेक्‍नॉलॉजी विभागाकडून ३५ लाखांचा संशोधन प्रकल्प मंजूर झाला आहे. सध्या ते न्यू कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक आहेत. डॉ. पाटील मुळचे कणेरी (ता. करवीर) चे. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. एमएसस्सी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नेट (जेआरएफ), गेट, सेट या परीक्षा उत्तीर्ण झाले. तसेच भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थाय प्रवेश परीक्षाही ते उत्तीर्ण झाले.  

त्यानंतर त्यांनी आयआयटी, बाँम्बेमधून पीएच.डी.ला प्रवेश घेतला. तेथे त्यांनी कॉम्प्युटर हार्ड डिस्कमधील रिड हेड मटेरियल या विषयावर संशोधन केले. येथे पीएच.डी. मिळवल्यानंतर दक्षिण कोरियातील सेंटर फॉर नॅनो बायो इंजिनिअरिंग अँण्ड स्पिन्ट्रॉनिक्‍समध्ये पोस्ट डॉक्‍टरल रिसर्चची सुरवात केली. 
 

४० शोधनिबंध प्रसिद्ध 

डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार पीएच.डी.चे विद्यार्थी संशोधन करतात. या विद्यार्थ्यांचे मॅग्नेटिक मटेरियल फॉर डेटा स्टोरेज, हेवी मेटल आयन रिमुव्हल फ्रॉम वेस्ट वॉटर व डायग्नोसिस अँण्ड थेरपी ऑफ कॅन्सर यावर संशोधन सुरू आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्स विभातील १५ विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे नामांकित पब्लिकेशन्समध्ये ४० शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

Latest Marathi News Live Update : ‘जी राम जी’वर लोकसभेची मोहोर ; रोजगारवाढीचा केंद्र सरकारचा दावा

Viral Video Fact Check: बेघर होऊन भीक मागताना सापडलेली महिला खरंच क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी? काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT