कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 95 टक्के प्रभागांचे आरक्षण पूर्णपणे बदलणार आहे. अनुसूचित जातीसाठी असलेल्या 11 प्रभागांवर खुल्या प्रवर्गाचे किंवा ओबीसीचे आरक्षण पडेल. त्यामुळे अनुसूचित जातीचे 11 प्रभाग नव्याने तयार होतील.
महापालिकेच्या मागील दोन निवडणुकांत जे प्रभाग ज्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, ते आरक्षण आता राहणार नाही. सोडतीवेळी या प्रभागांच्या चिठ्ठ्या बाजूला काढल्या जातील. दोन-तीन प्रभाग वगळता 95 टक्के प्रभागांतील आरक्षण बदलणार हे निश्चित आहे.
आरक्षण कशा पद्धतीने टाकायचे, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. ठराविक प्रभागावर तेच आरक्षण कायम राहू नये, यासाठी रोटेशनची पद्धत अवलंबली आहे. अनुसूचित जातीसाठी जे 11 प्रभाग राखीव आहेत, ते त्यासाठीच राखीव राहतील असा अनेकांचा गैरसमज आहे; मात्र लोकसंख्येच्या आधारे निवडणूक आयोग संबंधित प्रभाग निश्चित करतो. सध्या जे प्रभाग राखीव आहेत तेथे पुरुष, महिला अथवा ओबीसी महिला, पुरुष असे आरक्षण पडू शकते.
सध्या 81 पैकी 41 प्रभाग महिलांसाठी तर 40 प्रभाग पुरुषांसाठी राखीव आहेत. 50 टक्के आरक्षण महिलांसाठी असल्याने त्यांच्या प्रभागांची संख्या 41 आहे. 22 प्रभाग हे ओबीसींसाठी राखीव आहेत. या प्रभागांवरील आरक्षण बदलून ते महिला अथवा पुरुषांसाठी खुले होऊ शकतात. 24 प्रभाग हे सर्वसाधारण (खुला वर्ग) आहेत. त्यांचे आरक्षण बदलून तेथे ओबीसी पुरुष किंवा महिलांसाठी राखीव होतील. महिलांसाठीचे 24 प्रभाग आहेत, त्यांचे आरक्षण बदलणार आहे. हे प्रभाग ओबीसी अथवा सर्वसाधारण होतील.
असे पडेल आरक्षण
प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करताना 2005, 2010 आणि 2015 च्या निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. शुगरमिल प्रभाग 2005 मध्ये ओबीसी प्रवर्गासाठी, 2010 मध्ये खुला तर 2015 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होता. त्यामुळे 2020 च्या निवडणुकीत या प्रभागावर अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडणार नाही. एक तर हा प्रभाग सर्वसाधारण महिला किंवा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित राहील.
अशी असणार रचना
महापालिका क्षेत्रात 81 प्रभाग आहेत. महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने त्यातील 41 प्रभाग महिलांसाठी आरक्षित असतील.
48 प्रभाग खुले असून त्यातील 24 महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 11 प्रभाग आरक्षित राहणार आहेत.
इतर मागासवर्गीयसाठी 22 प्रभाग आरक्षित राहणार असून त्यापैकी 11 प्रभाग याच प्रवर्गातील महिलांसाठी असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.