Reserved Private Hospitals In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीतील "एवढी' खासगी रुग्णालये केली आरक्षित...कशासाठी..? वाचा सविस्तर...

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : शहरातील 33 खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आता कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत. याबाबतचा आदेश आज मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी दिला आहे. यावर वेगवेगळ्या प्रकारचे नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

सध्या शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आयजीएम रुग्णालयावर ताण वाढत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील खासगी रुग्णालयातील बेड अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाकडून सुरू केली आहे. दहापेक्षा जास्त बेड असलेली शहरात एकूण 33 रुग्णालये आहेत. या रुग्णालयातील 80 टक्के बेड हे कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत.

इतर 20 टक्के बेड हे संबंधित रुग्णालयाच्या अधिकार कक्षेत असणार आहेत. 
प्रारंभी सर्वच रुग्णालयातील बेड अधिग्रहीत करण्याचे आदेश होते. त्यानुसार 75 रुग्णालयांची यादी पालिका प्रशासनाकडून तयार केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या सुधारित आदेशानुसार 10 बेडपेक्षा जास्त बेड असणारी 33 रुग्णालये आहेत.

या रुग्णालयांना मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी नोटीस काढून 80 टक्के बेड आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामध्ये समन्वयक अधिकारी, बेड व्यवस्थापक अधिकारी, तसेच बिल पडताळणी अधिकारी यांची नियुक्तीही केली आहे. 

दर्शनी भागात माहिती फलक 
खासगी रुग्णालयाच्या दर्शनी भागात 80 टक्के कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी आरक्षित बेडबाबत माहिती फलक लावण्याची सूचना दिली आहे. यामध्ये आरक्षित बेड व रिक्त बेडची संख्या फलकावर स्पष्टपणे नमूद करण्याचा आदेशही मुख्याधिकारी पाटील यांनी दिला आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT