Respect to Shiv Sena in Radhanagari Panchayat Samiti 
कोल्हापूर

राधानगरी पंचायत समितीत शिवसेनेला मान

मोहन नेवडे

राधानगरी : राधानगरी पंचायत समितीच्या सभापतिपदी सत्ताधारी महाआघाडीच्या घटक असलेल्या शिवसेनेच्या सौ. सुशीला शामराव भावके यांची बिनविरोध निवड झाली. निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा पीठासन अधिकारी संतोष कणसे होते.

पंचायत समितीच्या 10 जागांवर कॉंग्रेस पाच, राष्ट्रवादी कॉंग्रेस चार व शिवसेना एक असे बलाबल आहे. तिन्ही पक्षांची मिळून महाआघाडी एकत्रितपणे कारभार करीत आहे. राष्ट्रवादीच्या दीपाली पाटील यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज एकमताने भावके यांची निवड केली. बैठकीला उपसभापती मोहन पाटील, सदस्य- रविष पाटील, दीपाली पाटील, वंदना हळदे, सोनाली पाटील उपस्थित होते. तडजोडीनुसार सेनेच्या सदस्याला सभापती पदाची संधी मिळाली आहे. या निवडी प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णराव किरुळकर, तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, "गोकुळ'चे संचालक पांडुरंग धुंदरे, डॉ. प्रशांत भावके, संजय पाटील, ए. डी. चौगले, विजय बलुगडे, अशोक फराक्‍टे, अशोक वारके यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT