Mahavitran SAKAL
कोल्हापूर

कृषीपंप वीज बिल थकबाकीमुक्त योजनेत शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कृषीपंप वीज बिल थकबाकीमुक्त योजनेत जिल्ह्यातील ७८ हजार ८०८ शेतकऱ्यांनी थकबाकी मुक्त योजनेत सहभाग नोंदविला.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कृषीपंप वीज बिल थकबाकीमुक्त योजनेत जिल्ह्यातील ७८ हजार ८०८ शेतकऱ्यांनी थकबाकी मुक्त योजनेत सहभाग नोंदविला. त्यांनी थकबाकीपोटी ७२ कोटी ६१ लाख व चालू वीजबिलांच्या ४० कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रक्कमेएवढी, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली, विलंब आकार व व्याजातील सूट यापोटी एकूण ८९ कोटी ६ लाख रुपये माफ झाले आहेत.

दरम्यान, ५५ हजार १४३ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह थकबाकीच्या ५० टक्के रक्कमेचे एकूण ७५ कोटी ७५ लाख रुपये भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ५८ कोटी ६१ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल थकबाकीमुक्त योजनेत करण्यासाठी जुन्या थकबाकीत तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे.

गेल्या मार्चपासून महावितरणने कृषी पंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरवात केली. धोरणातील योजनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १ लाख ४५ हजार ४६२ शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. निर्लेखनाद्वारे महावितरणकडून मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी रक्कम वगळून या शेतकऱ्यांकडे ४११ कोटी १५ लाख सुधारित थकबाकी आहे.

यातील ५० टक्के थकबाकी तसेच चालू वीजबिलांचे १०२ कोटी ९२ लाख रुपयांचा भरणा येत्या मार्च २०२२ पर्यंत केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम देखील माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभागी व्हावे व सोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय खालावली आहे. त्यामुळे थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा भरणा नाही, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत असल्याचे महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता अंकूर कावळे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT